घरCORONA UPDATE...आणि गर्भवती महिला दुबईत अडकली; मायदेशी जाण्यासाठी करते विनवणी

…आणि गर्भवती महिला दुबईत अडकली; मायदेशी जाण्यासाठी करते विनवणी

Subscribe

एक भारतीय गर्भवती महिला दुबईत अडकल्याने या महिलेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अर्थातच रेल्वे, बस आणि विमान वाहतूक देखील ३ मे पर्यंत बंद राहणार आहे. मात्र, याचा फटका एका भारतीय गर्भवती महिलेला बसला आहे. ही महिला दुबईमध्ये अडकली असून आपल्याला मायदेशी परत याचे आहे, याकरता मला मदत करा, अशी विनवणी या गर्भवती महिलेनी केली आहे.

सुप्रीम कोर्टात याचिका केली दाखल

गल्फच्या वृत्तानुसार, गीता श्रीधरन (२७) वर्षीय भारतीय गर्भवती महिला नितिन चंद्रन या आपल्या पतीसोबत दुबईला राहत आहे. मात्र, सध्या ही महिला आता गर्भवती असून तिची येत्या जुलै महिन्यात प्रसूती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिला आपल्या मायदेशी यायचे आहे. मात्र, सध्या उड्डाणे बंद असल्यामुळे आपल्या मायदेशी येण्यासाठी मदत करावी, याकरता या महिलेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र, सध्या देशात लॉकडाऊन असल्यामुळे उड्डाणे देखील बंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

२४ तासांत कोरोनाचे १ हजार ७३८ बळी!

अमेरिकेत तर कोरोनाने अक्षरश: कहर केला आहे. गेल्या २४ तासांत १ हजार ७३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु, मागील दिवसांच्या तुलनेत आकडेवारीत मृतांच्या संख्येत घट होत असल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापिठाने दिली आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे ४६ हजार ५८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाच्या मृतांच्या आकडेवारीत अमेरिका पहिला क्रमांकावर आहे.


हेही वाचा – CoronaVirus: अमेरिकेत कोरोनाचा कहर; २४ तासांत कोरोनाचे १ हजार ७३८ बळी!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -