धक्कादायक! प्रसूतीसाठी गरोदर महिलेला खाटेवर झोपवून नदीतून नेले, व्हिडीओ व्हायरल

एका गरोदर महिलेला प्रसुतीसाठी खाटेवर झोपवून वाहणाऱ्या नदीतून नेल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशात घडली आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून एका गर्भवती महिलेला खाटेवर झोपवून नदी पार केली.

एका गरोदर महिलेला प्रसुतीसाठी खाटेवर झोपवून वाहणाऱ्या नदीतून नेल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशात घडली आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून एका गर्भवती महिलेला खाटेवर झोपवून नदी पार केली. अनेक वर्षांपासून ही समस्या असूनही आजतागायत प्रशासनाकडून पुढाकार घेतला नसल्याची माहिती समोर येत आहे. (pregnant woman carried away through a raging river in tribal dominated area of mp video viral)

मिळालेल्या माहितीनुसार, बैतूलच्या शाहपूर ब्लॉकच्या ग्रामपंचायत पॉवरझंडा अंतर्गत जामुंधना गावातील ही घटना आहे. मध्य प्रदेशातील या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, प्रत्यक्षात गावातून वाहणाऱ्या नदीवर आजपर्यंत एकही पूल बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात लोकांची ये-जा विस्कळीत होते. अनेक वर्षांपासून ही समस्या असूनही आजतागायत प्रशासनाकडून पुढाकार घेण्यात आलेला नाही.

पूल बांधण्याच्या मागणीबाबत ग्रामस्थांनी यापूर्वीही तक्रारी केल्या होत्या. तसेच, प्रशासनाला या समस्येची वारंवार जाणीव करून दिली आहे. मात्र तरीही प्रशासनाकडून अद्याप त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यात आलेला नाही. ग्रामस्थांच्या समस्येकडे शासन व प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही येथील आदिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की गरोदर महिलेला खाटेवर बसवून तिला प्रसूतीसाठी वाहणाऱ्या नदीत जीव मुठीत धरून स्थानिक आदिवासींना बळजबरीने घेऊन जावे लागत आहे. वास्तविक हे प्रकरण आहे बैतूलच्या शाहपूर ब्लॉकच्या ग्रामपंचायत पॉवरझंडा अंतर्गत जामुंधना गावातील आहे.

संततधार पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे आदिवासीबहुल भागातील विकासाची स्थिती स्वत:हून उघडकीस आणणारी आहे. गेल्या 24 तासांत पश्चिम आणि मध्य मध्य प्रदेशात सतत पाऊस पडत असून सध्या तरी दिलासा मिळालेला नाही.

हवामान खात्याने इंदूर, उज्जैन, नर्मदापुरम आणि जबलपूर विभागातील जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा नारंगी इशारा जारी केला आहे. अहवालानुसार, गेल्या २४ तासांत इंदूर आणि बैतुल जिल्ह्यात नद्या आणि नाल्यांना पूर आल्याने किमान ७ जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – राज्यातील रेल्वे स्थानकांवर स्वातंत्र्यलढ्याचे विविध पैलू प्रदर्शित करणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन