घरदेश-विदेशकोरोनाच्या संशयामुळे गरोदर महिलेला मारहाण, बाळाचा गेला जीव

कोरोनाच्या संशयामुळे गरोदर महिलेला मारहाण, बाळाचा गेला जीव

Subscribe

झारखंड पोलिसांनी या घटनेची दखल घेत जमशेदपूर एसएसपीला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत

झारखंडच्या जमशेदपूर येथे असलेल्या एमजीएम रुग्णालयात गर्भवती महिलेला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. रक्तस्त्राव होत असताना या अवस्थेत ती महिला रुग्णालयात पोहोचली होती, परंतु रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी तिच्यावर कोरोना व्हायरस मुद्दाम पसरवते, असा आरोप करण्यात आला. यावेळी तिला जबर मारहाणही करण्यात आली. या मारहाणीत गरोदर महिलेच्या पोटातील बाळाला त्रास होऊन बाळाचा पोटातच जीव गेला. झारखंड पोलिसांनी या घटनेची दखल घेत जमशेदपूर एसएसपीला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर या घटनेबाबत महिलेने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार देखील केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे केली अशी तक्रार

वयवर्ष ३० असणाऱ्या गरोदर महिलेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून घडलेला प्रकार सांगितला. तिने या पत्रात असे लिहीले की, ‘गुरूवारी मला अचानक त्रास होऊन रक्तस्त्राव होण्यास सुरूवात झाली, त्यानंतर मी आपल्या भावासोबत एमजीएम रुग्णालयात पोहोचले. तोपर्यंत रक्तस्त्राव सुरूच होता. यामुळे माझी तब्येत अचानक अधिक बिघडली. मात्र ज्यावेळी आम्ही रूग्णालयात पोहोचलो तेव्हा रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी नीट वागणूक दिली नाही. यावेळी जमिनीवर माझे सर्वत्र रक्त झाल्याने ते देखील कर्मचार्‍यांनी मलाच साफ करायला सांगितले.

- Advertisement -

‘…तर माझं बाळ वाचलं असतं’

तसेच गरोदर महिलेने असे ही सांगितले की, ‘रूग्णालयातील एका नर्सने कदाचित ती डॉक्टरही असू शकते, त्या नर्सने मला माझ्या नावासह धर्मावरून शिवीगाळ केली. जमिनीवर जे रक्त सांडले होते ते देखील मलाच साफ करण्यास सांगितले आणि माझ्यावर कोरोना पसरवण्याचा आरोप करून मला चप्पल काढून मारहाण केली.रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नीट चौकशी केली असती तर आज माझं बाळ वाचलं असतं.’


Corona: मास्क घातलं नाही म्हणून दिव्यांग मुलाचा वडिलांनी घेतला जीव!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -