घरताज्या घडामोडीराष्ट्रपतींनी हरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला

राष्ट्रपतींनी हरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला

Subscribe

गुरुवारी कृषीविषयक तीन विधेयकांच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता पंतप्रधान मोदींशी सल्लामसलत केल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हरसिरत कौर बादल यांचा राजीनामा स्वीकारला आहे. घटनेच्या कलम ७५च्या खंड (२) अंतर्गत केंद्रीय मंत्री मंडळाकडून हरसिमरत यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे.

- Advertisement -

दरम्यान पंतप्रधानांशी सल्लामसलत केल्यानंतर राष्ट्रपतींनी कॅबिनेट मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना त्यांच्या विद्यमान विभागांव्यतिरिक्त केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री या पदाचा कार्यभार देण्याचे निर्देश दिले आहे.

मोदींच्या कॅबिनेटमधून राजीनामा देण्याबाबतची माहिती हरसिमरत कौर बादल यांनी ट्विट करून दिली होती. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘शेतकरीविरोधी अध्यादेश आणि विधेयकांच्या निषेधार्थ मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शेतकऱ्यांची बहीण आणि मुलगी म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचा मला अभिमान आहे.’ हरसिमरत कौर बादल या केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री होत्या. भाजपचा मित्रपक्ष शिरोमणी अकाली दल कृषीविषयक विधेयकांचा विरोध करत असल्यामुळे हरसिमरत कौर यांनी राजीनामाचा निर्णय घेतला.

- Advertisement -

गुरुवारी लोकसभेत हे विधेयक मांडले गेले असता शिरोमणी अकाली दलाचे खासदार सुखबीर सिंह बादल यांनी निषेध केला. त्यांनी सरकार मोठा धक्का देत हरसिमरत कौर बादल या मंत्रीपदाचा राजीनामा देतील असे त्यांनी जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरसिमरत यांनी चार पानी राजीनामापत्र पाठवून सरकारला लक्ष्य केले. ‘केंद्र सरकारला वारंवार शिरोमणी अकाली दलाने विनंती करूनही त्यांनी या विधेयकांबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. आमच्या पक्षाची परंपरा शेतकऱ्यांच्या हितरक्षणाची असून पक्षाचा प्रत्येक सदस्य शेतकरी आहे’, असे हरसिमरत यांनी पत्रात म्हटले आहे.


हेही वाचा – ‘या’ तारखेला मिळणार कोरोनाची लस; राज्यसभेत आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -