घरदेश-विदेशराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 मिनिटे अंधारात केले भाषण; वीज गेल्यामुळे चौकशीचे आदेश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 मिनिटे अंधारात केले भाषण; वीज गेल्यामुळे चौकशीचे आदेश

Subscribe

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) ओडिसामध्ये (Odisa) विद्यापीठाच्या 12 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना अचानक वीज गेल्यामुळे त्यांना अंधारात भाषण सुरूच ठेवावे लागले. या प्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिशामधील महाराजा श्री रामचंद्र भंजदेव विद्यापीठाच्या (Maharaja Shri Ramchandra Bhanjdev University) 12 व्या दीक्षांत समारंभाला आज (6 मे) उपस्थिती लावली होती. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सकाळी अचानक 11.56 ते दुपारी 12.05 वाजेपर्यंत नऊ मिनिटे वीज गेल्यामुळे संपूर्ण सभागृहात अंधार पसरला होता. मात्र, या अंधारातही राष्ट्रपतींनी आपले भाषण सुरूच ठेवले. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करणे थांबवले नाही. यावेळी त्या हसत म्हणाल्या की, “आजचा हा कार्यक्रम बघून विजेलाही आमचा हेवा वाटू लागला आहे. आपण अंधारात बसलो असलो तरी अंधार आणि प्रकाश आपण दोन्ही बरोबरीने घेऊ.”

- Advertisement -

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाच्या वेळी 9 मिनिटे वीज गेल्यामुळे सर्वजण निषेध व्यक्त करत आहेत. या घटनेनंतर मयूरभंज जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींच्या कार्यक्रमादरम्यान वीज गेल्याबद्दल वीज विभागाने आपल्या चुकीबद्दल खेद व्यक्त केला आहे. माहिती व जनसंपर्क विभागानेही चूक मान्य केली आहे. दरम्यान, राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती प्रोफेसर गणेशी लाल, मंत्री प्रदीप कुमार अमत आणि कुलगुरू संतोष त्रिपाठीही उपस्थित होते.

विद्यापीठाच्या कुलगुरुंनी मागितली माफी
विद्यापीठाचे कुलगुरू संतोष कुमार त्रिपाठी (Santosh Kumar Tripathi) यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्या भाषणादरम्यान वीज गेल्यामुळे माफी मागितली आहे. ते म्हणाले की, “या दुर्दैवी घटनेसाठी मी स्वतःला दोषी मानतो. आम्ही या घटनेची निश्चितपणे चौकशी करू आणि या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाईल. राज्याच्या मालकीच्या औद्योगिक विकास महामंडळाने या घटनेसाठी जनरेटरचा पुरवठा केला. आम्ही त्यांच्याशी याबद्दल नक्कीच बोलू.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -