घरताज्या घडामोडीमंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोदी सरकारचा मोठा निर्णय; राष्ट्रपतींनी ८ राज्यात नेमले नवे राज्यपाल;...

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोदी सरकारचा मोठा निर्णय; राष्ट्रपतींनी ८ राज्यात नेमले नवे राज्यपाल; बघा यादी

Subscribe

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु असतानाच नुकतीच ८ राज्यांसाठी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. या राज्यांमध्ये कर्नाटक, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, गोवा, त्रिपुरा, झारखंड, हरियाणा आणि मिझोरम या राज्यांसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या राज्यपालांची नेमणूक केली आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्री थावरचंद गहलोत यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या वृत्तांनंतर ही घोषणा करण्यात आली.

- Advertisement -

बघा नव्या राज्यपालांची यादी

  • कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मिझोरमचे राज्यपाल म्हणून हरी बाबू कंभपती यांची नियुक्ती
  • मंगुभाई छगनभाई पटेल यांची मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • मिझोरमचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांची गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारु दत्तात्रय यांची हरियाणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाचा या आठवड्यात विस्तार होण्याची शक्यता आहे. यात २० नवे चेहरे झळकणार असून ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्या राज्यांबरोबरच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारला यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात प्राधान्य देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या नवीन मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भाजप नेते नारायण राणे, आणि खासदार हीना गावित यांचा समावेश करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तर सध्या मंत्रिमंडळात असलेल्या काहीजणांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या विस्तारात प्रामुख्याने पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशवर केंद्राचे विशेष लक्ष आहे. या राज्यातील नेत्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची अधिक शक्यता आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -