घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus: WHOने कोरोनाबाबतच्या 'त्या' ई-मेलकडे दुर्लक्ष केले - ट्रम्प

CoronaVirus: WHOने कोरोनाबाबतच्या ‘त्या’ ई-मेलकडे दुर्लक्ष केले – ट्रम्प

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेवर निशाणा साधला आहे. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर गंभीर आरोप करत तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. डिसेंबर मध्येच जागतिक आरोग्य संघटनेला समजले होते की, कोरोना व्हायरस माणसांमध्ये पसरणार आहे, एका पत्रकारद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप केला आहे. परंतु जागातिक आरोग्य संघटनेने याकडे दुर्लक्ष केले नाही आणि जगाला दिशाभूल करणारी माहिती दिली. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनाचे ६ लाख ७५ हजार ६४० रुग्ण आढळले असून त्यापैकी ३४ हजार ५२२ रुग्णांची मृत्यू झाला आहे.

फॉक्स न्यूजचा पत्रकार लान्ही चेन यांच्या प्रश्न पुन्हा मांडत ट्विट केलं की, डिसेंबरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य अधिकाऱ्यांच्या ई-मेलकडे नजर अंदाज का केले? ज्यामध्ये कोरोना व्हायरसचा मानवात प्रसार होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली होती? तसंच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात कोरोना व्हायरस पसरत होता असे खोटे आणि दिशाभूल करणारे दावे का केले? हे सर्व माहिती असूनही जागतिक आरोग्य संघटना निर्णायक घोषणा करण्यासाठी इतके दिवस का थांबली?, असा सवाल ट्रम्प यांनी केला आहे.

- Advertisement -

सुरुवातीपासून अमेरिका चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेवर आरोप करत आहे. जागतिक आरोग्य संघटना चीनची साथ देत असल्याचा आरोप देखील ट्रम्प यांनी केला होता.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: डॉक्टर आईचा कोरोनामुळे मृत्यू, मुलीने लिहिला शेवटचा ‘हा’ भावनिक मेसेज!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -