घरताज्या घडामोडीराष्ट्रपतींसह, पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रातील दुर्घटनांवर शोक व्यक्त, मोदींनी केलं मराठीमध्ये ट्विट

राष्ट्रपतींसह, पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रातील दुर्घटनांवर शोक व्यक्त, मोदींनी केलं मराठीमध्ये ट्विट

Subscribe

महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.

महाराषट्रात मुसळधार पावासामुळे कोकणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रायगडसर कोकणात दरड कोसळल्याच्या घटनेमध्या ४४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील दुर्घटनांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील आहे असे राष्ट्रपती यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये ट्विट करत दुर्घटनेवर शोक व्यक्त करत महाराष्ट्रावरील आपत्ती परिस्थितीला समोरं जात असलेल्या नागरिकांसाठी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या शोक संवेदना

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत क्लेश वाटला. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना.जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात ही सदिच्छा.महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे. आशा आशयाचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

- Advertisement -

राष्ट्रपती कोविद यांच्याकडून शोक व्यक्त

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करुन महाराष्ट्रातील दुर्घटनेत मृत पावलेल्याच्या कुटुंबीयांना दुःखातून सावरण्यासाठी प्रार्थना केली आहे. महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी तसेच इतर भागात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मृत्यूंची घटना दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीयांना या दुःखातून उभारण्यासाठी प्रार्थना करतो. मला विश्वास आहे की, राज्यातील आपत्कालीन व्यवस्था पथक योग्य मदत करुन नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचवतील अशा आशयाचे ट्विट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -