Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया यशस्वी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया यशस्वी

Related Story

- Advertisement -

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ३ मार्चला कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर त्यांना २७ मार्च (शनिवारी) रोजी दुपारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोविंद यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. आज त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया केली असून ती यशस्वीरित्या पार पडली आहे. याबाबतची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

राजनाथ सिंह म्हणाले की, ‘यशस्वी शस्त्रक्रियेसाठी मी डॉक्टरांच्या टीमचे अभिनंदन करतो. राष्ट्रपतीची प्रकृती जाणून घेण्यासाठी आम्ही एम्स रुग्णालयाच्या संचालकाशी संवाद साधला. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो.’

- Advertisement -

शुक्रवारी छातीत दुखत असल्यामुळे रामनाथ कोविंद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्यानंतर त्यांच्या आरोग्याची तपासणी केली होती. सध्या डॉक्टरांना देखरेखी खाली कोविंद यांना ठेवण्यात आले आहे. जेव्हा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर उपचार सुरू होते, तेव्हा काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकृतीबाबत विचारण्यासाठी संपर्क साधला होता. माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मुलांसोबत बातचित केली होती. याशिवाय यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विट केले होते.


- Advertisement -

हेही वाचा –  Corona Vaccination: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोरोना लसीचा घेतला पहिला डोस


 

- Advertisement -