Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona Vaccination: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोरोना लसीचा घेतला पहिला डोस

Corona Vaccination: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोरोना लसीचा घेतला पहिला डोस

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नव वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १६ जानेवारीपासून सर्वत्र देशभरात कोरोना लसीकरणाच्या मोहीमेला सुरुवात झाली. सीरम इन्स्टिट्यूची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या दोन लसीचे डोस सध्या दिले जात आहे. १ मार्चपासून लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली. आज (बुधवार) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आर आर हॉस्पिटलमध्ये रामनाथ कोविंद यांनी कोरोनाची लस घेतली.

- Advertisement -

यापूर्वी गृहमंत्री अमित शाहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली. देशभरात आतापर्यंत १.५४ कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

आज ‘यांनी’ घेतली कोरोना लस

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. तसेच त्यांनी पात्र असलेल्या सर्वांना लसीकरणासाठी पुढे येणाचे आवाहन केले. यामुळे गोवा कोरोनामुक्त होण्यास मदत होईल असे प्रमोद सावंत म्हणाले.

- Advertisement -

ब्राझीलचा फुटबॉलपटू पेले गेट्सने कोरोनाची लस घेतली.

सिक्किमचे राज्यपाल गंगा प्रसाद यांनी आपल्या पत्नीसह कोरोना लसीचा पहिला डोस टोचून घेतला.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि त्यांची पत्नी लक्ष्मी पुरी यांनी यशोदरा सुपर स्पेशालिटीस्ट रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी कोरोना

मेघालयाचे राज्यपाल सत्या पाल मलिक यांनी कोरोनाची लस घेतली.

- Advertisement -