घरदेश-विदेशराजीव गांधींच्या मारेकऱ्यांना माफी नाही

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना माफी नाही

Subscribe

राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना माफी देण्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नकार दिला आहे. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडा, त्यांची शिक्षा माफ करा असा दया अर्ज तामिळनाडू सरकारने राष्ट्रपतींकडे केला होता. मात्र तामिळनाडू सरकारचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळून लावला आहे.

राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना माफी देण्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नकार दिला आहे. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडा, त्यांची शिक्षा माफ करा असा दया अर्ज तामिळनाडू सरकारने राष्ट्रपतींकडे केला होता. मात्र तामिळनाडू सरकारचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळून लावला आहे. २२ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांची मानवी बॉम्बच्या साहाय्याने हत्या करण्यात आली होती. हत्येतील सहभागी खाली मुरूगन, नलिनी आणि ए. जी. पेरारीवलन यांच्यासह आणखी ४ आरोपी सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांची जन्मठेपेची शिक्षा रद्द करावी यासाठी तामिळनाडू सरकारने केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळून लावला आहे.

माणुसकीच्या दृष्टीने विचार करा

मागील ४ वर्षामध्ये राजीव गांधी यांच्या शिक्षेसंदर्भात तामिळनाडू सरकारने २ वेळा केंद्रीय गृह मंत्रालयाला अर्ज केले आहेत. यामध्ये मारेकऱ्यांचा माणूसकीच्या दृष्टीने तरी विचार करावा अशी विनंती करण्यात आली आहे. शिवाय राष्ट्रपती यांच्याकडे देखील तामिळनाडू सरकारने दयेचा अर्ज केला होता. यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करत तामिळनाडू सरकारचा अर्ज फेटाळून लावला. शिवाय, माजी पंतप्रधानांचे खुनी कसे काय सुटू शकतात?असा सवाल देखील राष्ट्रपतींनी विचारल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -