अटलबिहारी वाजपेयींच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींसह मंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी आहे. 16 ऑगस्ट 2018 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते.

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी आहे. 16 ऑगस्ट 2018 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मंत्र्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधी स्थळावर जाऊन श्रद्धांजली वाहिली. (president vice president pm narendra modi pays floral tribute to former pm atal bihari vajpayee death anniversary)

अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहणाऱ्यांमध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही समावेश होता. तसेच, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही वाजपेयी यांनी पुष्पांजली वाहिली.

अटल बिहारी वाजपेयी हे तीन वेळा देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. तसेच, वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, अटल बिहारी वाजपेयी यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना 2015 साली भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला.

वाजपेयीजी खूप चांगले वक्ते होते आणि त्यांची बोलण्याची शैली खूप चांगली होती. वाजपेयी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होते. वाजपेयी हे कवी आणि पत्रकारही होते. अटलबिहारी वाजपेयी यांनी नेहमीच शिक्षण, समाज, भाषा आणि साहित्यावर भर दिला होता. वाजपेयी हे भाजपच्या संस्थापकांपैकी एक होते.

1957 सालात जनसंघाच्या तिकिटावर बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत जिंकून वाजपेयी हे पहिल्यांदा संसदेत पोहोचले. 1996 ते 2004 पर्यंत ते तीन वेळा देशाचे पंतप्रधान होते. ते 1996 मध्ये 13 दिवस, त्यानंतर 1998 मध्ये 13 महिने आणि 1999 ते 2004 अशी पूर्ण पाच वर्षे पंतप्रधान होते.

देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे 13 ऑगस्ट रोजी कांदिवलीत अनावरण झाले. दहिसर चेक नाक्यावरून वाजपेयी यांच्या पुतळ्याची वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात सजवलेल्या रथावरून ही यात्रा काढण्यात आली होती. या दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी वाजपेयी यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली.


हेही वाचा – अंडर-16 महिला हॉकी लीगला आजपासून सुरुवात; 16 संघ भिडणार