घरताज्या घडामोडीराष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हांना 'एआयएमआयएम'चा पाठिंबा; असदुद्दीन ओवैसीची घोषणा

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हांना ‘एआयएमआयएम’चा पाठिंबा; असदुद्दीन ओवैसीची घोषणा

Subscribe

येत्या १८ जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक (presidential election) होणार आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार असलेले यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना 'एआयएमआयएम'चा (AIMIM) पाठिंबा असल्याची घोषणा असदुद्दीन ओवैसी (aimim chief asaduddin owaisi) यांनी केली आहे.

येत्या १८ जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक (presidential election) होणार आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार असलेले यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना ‘एआयएमआयएम’चा (AIMIM) पाठिंबा असल्याची घोषणा असदुद्दीन ओवैसी (aimim chief asaduddin owaisi) यांनी केली आहे. ओवैसी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पाठींबा देण्याची घोषणा केली. (presidential election aimim chief asaduddin owaisi support opposition candidate yashwant sinha)

“राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एआयएमआयएमचे आमदार विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मतदान करतील”, असे ओवैसी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. माझे याआधीही सिन्हा यांच्याशी बोलणे झाले होते, असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

असदुद्दीन ओवैसी यांच्याआधी तेलंगणाचे मुख्यमंत्री (Telangana CM) केसीआर यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणा राष्ट्र समितीनं (TRS) त्यांना पाठिंबा जाहीर केला होता.

हेही वाचा – राष्ट्रपतीपदासाठी राजकीय उंची लागते, सदावर्तेंची पवारांवर टीका

- Advertisement -

२१ जून रोजी झालेल्या विरोधी पक्षाच्या एका बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा यांच्या नावाची संयुक्तपणे घोषणा करण्यात आली होती. विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजपकडून राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी

भाजपने द्रौपदी मुर्मू यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी घोषीत केले आहे. द्रौपदी मुर्मू ह्या २०१५ मध्ये झारखंडच्या राज्यपाल बनल्या. त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. त्या २००० ते २००४ पर्यंत ओडिशा विधानसभेत रायरंगपूरच्या आमदार होत्या आणि राज्य सरकारमध्ये मंत्री होत्या. भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दलाच्या युती सरकारमध्ये त्या ६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ पर्यंत स्वतंत्र प्रभारासह वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री होत्या. तसेच ६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ पर्यंत त्यांनी मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री भुषवले.


हेही वाचा – एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने उपसभापती, केंद्राला बजावली नोटीस बजावली

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -