घरताज्या घडामोडीराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर, १८ जुलैला होणार मतदान

राष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर, १८ जुलैला होणार मतदान

Subscribe

भारतीय निवडणूक आयोगाने आज राष्ट्रपती निवडणुकीची (Voting for Presidential elections) तारीख जाहीर केली आहे. देशाला लवकरच नवे राष्ट्रपती (President ) मिळणार आहेत. १८ जुलैला यासाठी मतदान होणार असून २१ जुलै रोजी निकाल लागणार आहे. देशातील ७७६ खासदार आणि ४०३३ आमदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तसेच २१ जुलै रोजी मतमोजणी होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी आज जाहीर केले आहे.

- Advertisement -

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै २०२२ रोजी संपत आहे. त्याआधीच देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. मागील ४५ वर्षांपासून याच निवडणूक पद्धतीने राष्ट्रपतींची देशाच्या सर्वोच्चपदी निवड होत आहे. १७ जुलै २०१७ रोजी राष्ट्रपतदीपदाच्या निवडणुका झाल्या. मात्र, आता राष्ट्रपतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असून जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आणि वरच्या सभागृहातील लोकप्रतिनिधी मतदान करणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, उमेदवारी आर्ज मागे घेण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा अवधी देण्यात येणार आहे. तर मतदानानंतर २ ते ३ दिवसांनी मतमोजणी पार पडणार आहे. परंतु राष्ट्रपतीपदासाठी सध्या पाच नावे चर्चेत आहेत. यामध्ये माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके, तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन आणि झारखंडच्या राज्यपाल द्रोपदी मुर्मू ही पाच नावे सध्या राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आहेत.


हेही वाचा : राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -