राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंबद्दल प्रशांत भूषण यांनी केले चुकीचे ट्विट

वकील प्रशांत भूषण हे अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. यातच त्यांच एक नवं ट्विट सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे. प्रशांत भूषण यांनी एनडीएच्यावतीने राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल एक फोटो ट्विट केला होता. ज्यामध्ये द्रौपदी मुर्मू आरएसएस प्रमुख मोहन भावगत यांच्यासोबत दिसत आहेत. मात्र या फोटोची तपासणी केली असता तो फोटो मॉर्फ्ड केल्याचे समोर आले आहे.

प्रशांत भूषण यांनी मॉर्फ्ड केलेला फोटो ट्विट केले आणि लिहिले की, भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी नागपूर येथील आरएसएस मुख्यालयात मोहन भागवत यांची भेट घेतली! त्या फक्त रबर स्टॅम्प असतील आणि स्वतंत्रपणे काम करू शकणार नाही यात काही शंका आहे का? या फोटोची चौकशी केली असता हा फोटो चुकीचा असल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत भूषण यांनी भाजपवर निशाणा साधण्यासाठी ट्विट केलेल्या फोटोसोबत छेडछाड करण्यात आली होती. हा फोटो दिशाभूल करणारा होता. त्यामुळे आता सोशल मीडिया यूजर्सनी प्रशांत भूषण यांना लक्ष्य केले. अशा स्थितीत भूषण यांनी माफी मागत आपले ट्विट डिलीट केले आहे.

यावर वकील प्रशांत भूषण यांनी ट्विट डिलीट करत लिहिले की, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासोबतचा फोटो मॉर्फ्ड करण्यात आल्याचे मला कळले आहे. अशा परिस्थितीत मी द्रौपदी मुर्मूची माफी मागून तो फोटो डिलीट करत आहे.


‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आलिया भट्टने हनीमूनबद्दल केला खुलासा, व्हिडीओ व्हायरल