घरताज्या घडामोडीEdible oil: आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलांच्या किंमतीत दुप्पटीने वाढ

Edible oil: आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलांच्या किंमतीत दुप्पटीने वाढ

Subscribe

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या किंमती आकाशाला भिडल्या

कोरोनाकाळात देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल डिझेलपासून खाण्यापिण्याच्या वस्तूंपर्यंत सर्व गोष्टींमध्ये महागाई झाली आहे. आता खाद्यतेलांच्या किंमतीतही मोठी वाढ झाल्याचे समजते आहे. भाज्या, फळे, डाळींच्या वाढत्या किंमतीसोबतच आता खाद्य तेलांच्या किंमतीही वाढल्यामुळे सामान्य नागरिकांसमोर मोठे आव्हान आहे. गेल्या एक वर्षांपासून खाद्य तेलांच्या किंमतीत दुप्पटीने वाढ झाली आहे. बिस्किट,बेकरी उत्पादने आणि इतर पॅकेट फूडसाठी पाम तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पाम तेलाच्या किंमती वाढल्यामुळे आता या पदार्थ्यांच्या किंमती वाढू शकतात. भारतात हॉटेल,रेस्टॉरंटमध्येही पाम तेलाचा मोठा वापर केला जातो. पाम तेल महाग झाल्यामुळे खाद्यतेल आणखी महाग होण्याची शक्यता आहे. (price of edible oils in international market is Double during Corona period)

खाद्यतेल व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. त्यामुळे भारतातील खाद्यतेलांच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे चीन यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठ्या प्रमाणात खाद्यतेल खरेदी करत असल्याने किंमती वाढल्या आहेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ही दरवाढ अशीच सुरु राहिली तर सर्व सामान्यांसाठी ही मोठी आपत्ती ठरेल. तेलाच्या किंमती जर सातत्याने वाढत राहिल्या तर पॅकेज फुडच्या किंमतीही वाढतील. कारण पॅक फुडमध्ये प्रामुख्याने पाम तेलाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे त्याच्या किंमती वाढू शकतात यात काही शंका नाही.

- Advertisement -

आपण पाहिले तर गेल्या वर्षांपासून पाम तेलासोबतच शेंगदाणा तेल,सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलातही दुप्पटीने वाढ झाली आहे. मे २०२०मध्ये पाम तेलाची किंमत ७६ रुपये होती मात्र यावर्षी त्यात दुप्पटीने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे शेंगदाण्याचे तेल १२० रुपये प्रति लीटर होते. वर्षभरात त्यातही वाढ होऊन आता शेंगदाणे तेलासाठी प्रति लीटर १९६ रुपये  मोजावे लागत आहेत.


हेही वाचा – Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या किंमती आज जैसे थे, जाणून घ्या आजचे दर

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -