घरताज्या घडामोडीपेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा महागले; जाणून घ्या आजचे दर

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा महागले; जाणून घ्या आजचे दर

Subscribe

मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत पाच पैसे वाढ झाल्याने दर प्रतिलिटर ८७ रुपये १९ पैसे झाला आहेत. तर डिझेलच्या किंमतीत १२ पैशांची वाढ झाली असल्याने दर प्रतिलिटर ७८ रुपये ८३ पैसे झाला आहे.

कोरोना आणि लॉकडाउनमुळे आर्थिक संकट असताना सर्वसामान्यांच्या खिशाला इंधन दरवाढीचे ग्रहण लागले आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काँग्रेसने वाढत्या इंधन दरावरुन राज्यभरात आंदोलन पुकारलं असताना सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.

- Advertisement -

दिल्लीतील पेट्रोलचे दर

राजधानी दिल्लीत सोमवारी पेट्रोलच्या दरात पाच पैसे वाढ झाली असून पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८० रुपये ८३ पैसे इतका झाला आहे. तर डिझेलच्या किंमतीत १३ पैसे वाढ झाली आहे. यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रतिलिटर ८० रुपये ५३ पैस झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सतत वाढत आहेत.

मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत ५ पैशांनी वाढ

मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत पाच पैसे वाढ झाल्याने दर प्रतिलिटर ८७ रुपये १९ पैसे झाला आहेत. तर डिझेलच्या किंमतीत १२ पैशांची वाढ झाली असल्याने दर प्रतिलिटर ७८ रुपये ८३ पैसे झाला आहे.

- Advertisement -
  • नोएडामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८१ रुपये ८ पैसे झाला असून डिझेलचा दर प्रतिलिटर ७२ रुपये ५९ पैसे झाला आहे.
  • गुरुग्राम येथे पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७८ रुपये ६४ पैसे असून डिझेल प्रतिलिटर ७२ रुपये ७७ पैशांना मिळत आहे.
  • तर, गाजियाबादमध्ये सोमवारी पेट्रोल प्रतिलिटर ८० रुपये ९५ पैशांना मिळत असून डिझेल प्रतिलिटर ७२ रुपये ४४ पैशांना मिळत आहे.

    हेही वाचा – देशात २४ तासांत १९ हजार ४५९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -