घरदेश-विदेशPrime Minister : मोदींशिवाय पंतप्रधान पदासाठी 'या' नेत्यांना आहे पसंती

Prime Minister : मोदींशिवाय पंतप्रधान पदासाठी ‘या’ नेत्यांना आहे पसंती

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत कमी झालेली नाही, अशी माहिती इंडिया टुडेने केलेल्या 'मूड ऑफ दे नेशन' या सर्व्हे मिळाली आहे. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजू शकते. या पार्श्वभूमीवर इंडिया टुडेने ‘मूड ऑफ दे नेशन’ या सर्व्हे करून देशातील जनतेचे जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व्हेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियता कमी झालेली नाही. या सर्व्हेतून मोदी हे पंतप्रधान पदी विराजमान होण्याची हॅटट्रिक साधणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या सर्व्हेत पंतप्रधान मोदी व्यतिरिक्त दुसरा पंतप्रधान पदाचा दावेदार कोण आहे? हा प्रश्न विचारण्यात आला होता. यात सर्वाधिक पसंती ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना नावाला मिळाली आहे. अमित शहा यांना 29 टक्के लोकांनी पसंती दिली.

या सर्व्हेवर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तिसऱ्या क्रमांक मिळाला आहे. या सर्व्हेत योगी आदित्यनाथ यांना 25 टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना 16 टक्के लोकांनी पंतप्रधान पदासाठी पसंती दिली आहे. 15 डिसेंबर 2023 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीदरम्यान इंडिया टुडेच्या ‘मूड ऑफ द नेशन’ने हा सर्व्हे पूर्ण झाला असून त्यांनी केलेल्या सर्व्हेतील अंदाज हा बरोबर असेलच असे नाही, असेही त्यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar: माँसाहेब जिजाऊच शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक; पवारांनी आदित्यनाथांचा दावा काढला खोडून

नरेंद्र मोदी हे 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान झाल्यापासून ते आतापर्यंत त्यांच्या लोकप्रियतेत कमी झालेली नाही. पंतप्रधान मोदींनी 2014 आणि 2019 मध्ये एकहाती विजय मिळविला आहे. मोदी सरकारमध्ये अमित शहांना चाणक्यची उपाधी देण्यात आली आहे. तसेच योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याचा मान देखील मिळाला. भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये योगींबद्दल प्रचंड आदर पाहायला मिळतो. कारण योगी यांची ओळख ही कट्टर हिंदुत्ववादी आणि उत्तर प्रदेशातील गुंडाराजवर नियंत्रण मिळवणारे, अशी त्यांची ओळख झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Rohit Pawar : महाराष्ट्रातील थोर व्यक्तींचा इतिहास आधी…; रोहित पवारांचा आदित्यनाथांवर निशाणा

गडकरींनी देशभरात रस्त्यांचे जाळ पसरविले

महाराष्ट्रातील भाजपाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री असलेले नितीन गडकरी यांची सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच ओळख आहे. गडकरींनी देशभरात रस्त्यांचे जाळ पसरवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पण गडकरी हे कंत्राटदारांना लगाम घालणे, भ्रष्टाचारी मुक्त कारभार आणि बाबूशाहीला चाप लावण्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -