घर देश-विदेश पंतप्रधान जस्टिन ट्रूडो कॅनडाच्या दिशेने रवाना; भारतात थांबण्यामागे 'हे' आहे कारण

पंतप्रधान जस्टिन ट्रूडो कॅनडाच्या दिशेने रवाना; भारतात थांबण्यामागे ‘हे’ आहे कारण

Subscribe

नवी दिल्ली : देशात G20 शिखर परिषद पार पडली. यावेळी जगभरातील अनेक देशाचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीत उपस्थितीत होते. यात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी G20 परिषदेसाठी आले होते. शिखर परिषद संपल्यानंतर ही कॅनेडियन पंतप्रधानांचा भारतातील मुक्काम वाढला होता. कारण पंतप्रधानांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते दिल्लीत राहिले होते. पण आता कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो हे आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास दिल्लीच्या पालम विमानतळावरून कॅनडाला जाण्यासाठी उड्डाण केले आहे.

कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांच्यासाठी कॅनडाच्या शिष्टमंडलाने एक बॅकउप विमान पावण्यात आल्याची माहिती कॅनेडियन वृत्तपत्र सीटीव्हीने दिली आहे. पंतप्रधानांना मायदेशात आणण्यासाठी एक विमान पाठविण्यात आले होते. हे विमान इंग्लंड मार्ग दिल्लीत दाखल झाले होते. पंतप्रधान ट्रुडो आणि शिष्टमंडळाला कॅनडाला आणण्यासाठी एक बॅकअप एअरबस CFCoo2 भारताकडे रवाना झाले आहे. विमान काल रात्री दिल्लीत लँड होणार आणि ट्रुडो हे आज कॅनडाला निघले आहेत, अशी माहिती पंतप्रधान ट्रुडोंचे प्रेस सचिव मोहम्मद हुसैन यांनी निवेदनातून माहिती आले.

- Advertisement -

हेही वाचा – G-20 मध्ये ऋषी सुनक यांच्याकडे दुर्लक्ष! ब्रिटिश मीडियाचा आरोप; म्हणाले…

ट्रुडोंची पीएम मोदींसोबत चर्चा

पंतप्रधान मोदी यांच्यासोबत ट्रुडोंची रविवारी बैठक झाली होती. यात कॅनडातील खलिस्तानी अतिरेक्याचा बैठकीत प्रमुख विषय होता. यावेळी पंतप्रधानांनी अतिरेकी घटकांच्या भारतविरोधी कारवायांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. कॅनडातील भारतीय समुदाय आणि प्रार्थनास्थळांना धोक्यात आणले जात आहे, अशी भीती पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. यानंतर खलिस्तानीसंदर्भात ट्रुडो म्हणाले, आम्ही हिंसेला विरोध करतो आणि कोणत्याही प्रकारचा द्वेषाची भावना दूर करू, असे ते म्हणाले.

- Advertisement -

- Advertisment -