हिंदूंपुरतेच नव्हे, सर्व वंचित समाजासाठी काम केले पाहिजे – पंतप्रधान मोदी

हिंदूंपुरते मर्यादित न राहता सर्व वंचित समाजासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत केले. 

Prime Minister Modi addressed the BJP National Executive
संग्रहित छायाचित्र

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकराणीच्या बैठकीत मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. इतर समुदायांमध्ये देखील वंचित आणि दलित वर्ग आहेत. आपण केवळ हिंदूंपुरते मर्यादित न राहता या सर्व वंचित समाजासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत केले.

हैदराबादमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पउत्तर प्रदेशातील आझमगढ आणि रामपूर या दोन मतदारसंघातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. या विजयात मुस्लीम मतदारांनी निर्णायक भूमिका बजावली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पसमांदा मुस्लिमांसारख्या समुदायांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन पक्षाला केले

दरम्यान यापूर्वी भाजपाने पसमांदा मुस्लीम समुदायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आता नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये पसमांदा समाजाच्या मतदारांनी भाजपाला पाठिंबा दिला असल्याचे मूल्यांकन पक्षाने केले आहे, अशी माहिती कार्यकारणीच्या बैठकीत उपस्थित असलेल्या एका नेत्याने दिली.