घरताज्या घडामोडीPM Narendra Modi : पंतप्रधान मोदी आज देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत सरकारी योजनांची...

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी आज देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत सरकारी योजनांची झाडाझडती घेणार

Subscribe

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉनफरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेणार आहेत. प्रोटोकॉल म्हणून या बैठकीत सर्व राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून नंदूरबारमधील जिल्हाधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉनफरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेणार आहेत. प्रोटोकॉल म्हणून या बैठकीत सर्व राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून नंदूरबारमधील जिल्हाधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘नरेंद्र मोदी देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील सरकारी योजनांचा आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची प्रगती आणि सद्यस्थिती याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारी योजनेसमोरील आव्हाने नेमकी काय आहेत आणि या योजनांमधील समस्यांचे निरसन कशाप्रकारे करता येईल याचा प्रयत्न या बैठकी दरम्यान करण्यात येणार आहे.’

- Advertisement -

केंद्राच्या विविध योजनांची अंमलबजावणी ही देशातील प्रत्येक जिल्ह्यात व्हावी, असा या बैठकीमागील उद्देश आहे. ‘पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशभरातील विकास आणि विकास कामांमधून देशभरातील नागरिकांची प्रगती होण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे. देशभरातील नागरिकांचा विकास होण्यासाठी सरकार कायम वचनबद्ध असल्याचे’, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

PM नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. जागतिक पातळीवर नेत्यांच्या पसंतीच्या यादीत 71 टक्क्यांच्या रेटिंगने मोदींचे नाव अग्रस्थानी आहे. मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सच्या जागतिक पातळीच्या 13 नेत्यांच्या यादीत अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाइडन यांचा सहावा क्रमांक आहे, त्यांना 43 टक्के रेटिंग मिळाली आहे. तर बाइडन यांच्यानंतर कॅनडाचे राष्ट्रपती ट्रुड्रो यांचे नाव आहे, त्यांना 43 टक्के रेटिंग मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना 41 टक्के रेटिंग मिळाले आहे.


हेही वाचा – उत्पल पर्रिकरांचा भाजपाने केलेला अपमान गोव्याची जनता विसरणार नाही – संजय राऊत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -