घर देश-विदेश PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केली 'विश्वकर्मा योजने'ची...

PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केली ‘विश्वकर्मा योजने’ची घोषणा, म्हणाले…

Subscribe

देशभरात आज 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करत देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी विकसित भारत बनविण्याचा संकल्प केला.

नवी दिल्ली : देशभरात आज 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करत देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी विकसित भारत बनविण्याचा संकल्प करत आपल्या भाषणातून आत्मनिर्भर भारत, मणिपूर हिंसाचार, शेतकरी, महिला सक्षमीकरण, युवाशक्ती, शेजारी राष्ट्रांबद्दलचं धोरण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांच्या दुसऱ्या टर्ममधील हे शेवटचे भाषण होते, त्यामुळे त्यांच्या या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. पंतप्रधानांनी देखील देशांतील नागरिकांच्या दृष्टीने यावेळी एका महत्त्वाच्या अशा योजनेची घोषणा केली. (Prime Minister Narendra Modi announced ‘Vishwa Karma Yojana’ from Red Fort)

हेही वाचा – PM Modi : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे मणिपूरच्या नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन

- Advertisement -

पुढच्या महिन्यात देशभरात विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात येणार आहे. याच जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विश्वकर्मा योजने’ बाबतची माहिती दिली. तसेच, या नव्या योजनेची घोषणा त्यांनी लाल किल्ल्यावरून केली. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ही योजना देशात फर्निचर किंवा लाकडाचे काम करणाऱ्या, सलून चालवणाऱ्या, शूज बनवणाऱ्या आणि घरे बांधणाऱ्या गवंडींना आर्थिक मदत करणार आहे. तसेच पारंपरिक कौशल्य असलेल्यांसाठी पुढील महिन्यात सरकारकडून ही योजना सुरू करण्यात येईल. महत्त्वाची बाब म्हणजे सरकार 13 हजार ते 15 हजार कोटी रुपयांच्या वाटपासह ही योजना सुरू करेल, त्यामुळे या योजनेचा सर्वाधिक फायदा हा ओबीसी बांधवांना होईल.

यावेळी त्यानी तंत्रज्ञानाविषयी बोलताना सांगितले की, आज देशातील तरुणांना जेवढे भाग्य लाभले आहे तेवढे क्वचितच कुणाला मिळते.आपण ते गमावू नये. येणारा काळ हा तंत्रज्ञानाच्या प्रभावाचा असणार आहे. आपली छोटी शहरे आणि शहरे लोकसंख्येच्या दृष्टीने लहान असतील पण त्यांची क्षमता कोणापेक्षाही मागे नाही. देशात संधींची कमतरता नाही. आपल्याला पाहिजे तितक्या संधी देण्याची क्षमता या देशामध्ये आहे.बदलत्या जगाला भारत आकार देणार आहे.

- Advertisement -

कोरोना काळात भारताने केलेली उत्तम कामगिरी जगाने पाहिली आहे. कोरोना काळात जगाने भारताची ताकद पाहिली आहे. कोरोनानंतर जागतिक समीकरणे बदलली आहेत, आता भारताला संधी आहे, त्यामुळे ही संधी सोडायची नाही. तसेच, 2014 मध्ये भारत जगातील अर्थव्यवस्थेत 10 व्या स्थानावर होता. आज 9 वर्षानंतर भारत 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. परंतु आपल्याला येत्या 5 वर्षात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनायचे असून ते आपण येत्या काळात करणार आहोत. त्याचप्रमाणे देशातील साडे तेरा कोटी जनता ही गरिबीतून मुक्त झाली असून ती विकासाच्या मार्गावर असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

- Advertisment -