Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश "श्री रामांना टाळ्यात बंद केल्यानंतर आता...", काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पंतप्रधानांची टीका

“श्री रामांना टाळ्यात बंद केल्यानंतर आता…”, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पंतप्रधानांची टीका

Subscribe

मुंबई | “पहिले श्री रामांना (Shri Ram) कुलूपबंद केले आणि आता बजरंगबली बोलणाऱ्यांना टाळ्यात बंद करण्याचा प्रण काँग्रेसने घेतला आहे”, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. आज काँग्रेसचा (Congress) जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. यात कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर बजरंग दलावर बंदी (Bajrang Dal) घालण्याचे आश्वासन दिले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Elections 2023) पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. यासभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला लक्ष केले.

कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकसाठी काँग्रेसने जाहीरनाम्याची घोषणा केली आहे. यात म्हटले की, “कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यासोबत बजरंग दलावर देखील बंदी घालणार आहे”.

- Advertisement -

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज मला हनुमानच्या पवित्र भूमीला नतमस्तक होण्याचे सौभाग्य मिळाले आहे आणि दुर्दैव पाहा की, मी ज्या हनुमानला नतमस्तक होण्यासाठी येथे आलो आहे. त्याचवेळी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी श्री रामाला टाळ्यात ठोकले होते आणि आता जय बजरंगबली म्हणणाऱ्यांना बंदी घालण्याचा प्रण काँग्रेसने घेतला आहे. या देशाचे दुर्दैव आहे की, काँग्रेस पक्षाला प्रभू श्री रामाचाही त्रास होत होता आणि आता बजरंगबलीचा जय घोष करणाऱ्यांचा ही त्रास होत आहे

कर्नाटकची प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही

- Advertisement -

पंतप्रधान मोदी काँग्रेसवर टीका करताना म्हणाले, “भाजप ही कर्नाटकच्या प्रतिष्ठेला आणि संस्कृतीला धक्का लावू देणार नाही. त्याचबरोबर कर्नाटकच्या विकासासाठी स्थानिक लोकांना आधुनिक सुविधा आणि नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे.”

“काँग्रेसने आपल्या कारकिर्दीत गावे आणि शहारांमधील दरी खूप वाढवली होती. परंतु, आता भाजप सरकार हे अंतर कमी करण्यासाठी काम करत आहेत. आज शहरांसारख्या सुविधा या पूर्वीच्या तुलनेत अधिक वेगाने आपल्या खेड्यांमध्ये पोहोचत आहेत”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हेही वाचा – कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध; ‘ही’ आहेत महत्त्वाची आश्वासने

भाजपच्या जाहीरनामा महत्त्वाची आश्वासने 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपचा जाहीरनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

  • भाजपने जाहीरनाम्यात समान नागरी कायदा लागू करणार
  • राज्यातील प्रत्येक प्रभागात अटल आहार केंद्राची स्थापना करणात
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना तीन सिलिंडर मोफत दिले जाणार आहे.
  • बीपीएल कुटुंबांना दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध आणि दर महिन्याला पाच किलो धान्याचे किट
  • ५ लाखांच्या कर्जापर्यंत व्याज लागणार नाही.
  • शेतकऱ्यांना बियाणांसाठी दहा हजार तर गरीब कुटुंबांना पाच किलो तांदूळ आणि भरड धान्य मिळणार

हेही वाचा – अर्धा लिटर नंदिनी दूध आणि 3 मोफत गॅस सिलिंडर; भाजपचे कर्नाटकच्या जनतेला आश्वासन

 

- Advertisment -