घरदेश-विदेश'या' कारणासाठी मागितली पंतप्रधानांनी देशातील जनतेची माफी

‘या’ कारणासाठी मागितली पंतप्रधानांनी देशातील जनतेची माफी

Subscribe

दिल्ली येथे गर्वी गुजरात भवनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमानंतर बोलताना मोदींनी देशाची माफी मागितली.

सध्या जैन धर्मियांचे पर्युषण पर्व सुरु आहे. या पर्युषण काळात क्षमायाचना मागण्याची प्रथा आहे, तसेच त्याला विशेष महत्त्वही आहे. याच प्रथेला अनुसरून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेची माफी मागितली आहे. यासाठी त्यांनी जैन धर्मातील परंपरेचा उल्लेख करत मिच्छामी दुक्कडम असे म्हणत देशाची माफी मागितली आहे. दिल्ली येथे गर्वी गुजरात भवनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमानंतर बोलताना मोदींनी हे उद्गार काढले.

- Advertisement -

गणेश चतुर्थीच्याही दिल्या शुभेच्छा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ते म्हणाले की, “जैन धर्मीयांचे पर्युषण सुरु आहे. जैन परंपरेतला ‘मिच्छामी दुक्कडम हा एक उत्तम संस्कार आहे. मनातून, वचनातून, कर्मातून जर कुणाला दुःखी केले असेल, वेदना दिल्या असतील तर मिच्छामी दुक्कडम अर्थात क्षमा याचना मागितली जाते. आज मी देखील गुजरातच्या जनतेची, देशाच्या जनतेची आणि जगाचीही क्षमायाचना करतो”, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करणाऱ्या योगदानासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव केला जाणार आहे. यापूर्वी सहा मुस्लिम राष्ट्रांनी आणि रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना गौरविले आहे. आज, सोमवारी पंतप्रधान कार्यालयाने बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशकडून त्यांचा गौरव केला जाणार आहे. या अभियानाच्या मार्फत देशात ८ कोटींहून अधिक स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात आली आहे. यापूर्वी २०१८ मधील ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी कौतुक केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -