पंतप्रधान मोदी कारगिल दौऱ्यावर, जवानांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील आठ वर्षांपासून भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली पंतप्रधानपदि विराजमान झाल्यापासून ते नेहमीच देशसेवेसाठी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात.

pm modi meet soldiers for diwali

देशभरात प्रत्येक जण आनंदाने आणि उत्साहाने दिवाळी साजरी करत आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर प्रत्येक वर्षी भारताच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. यापूर्वीही त्यांनी सीमेवरील विविध भागात जाऊन भारतीय लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. यावेळी ते जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवत जम्मू-काश्मीरमधील कारगिल द्रास येथे भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी कारण्यासाठी पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील आठ वर्षांपासून भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून ते नेहमीच देशसेवेसाठी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी जम्मू-काश्मीरमधील कारगिल द्रास येथे भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी कारण्यासाठी पोहोचले.
पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी नेहमीच सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. यापूर्वीही त्यांनी सीमेवरील विविध भागात लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.

23 ऑक्टोबर 2014 मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. यानंतर 23 ऑक्टोबर 2014 रोजी त्यांनी पंतप्रधान म्हणून सियाचीनमध्ये सैनिकांसोबत पहिली दिवाळी साजरी केली.

11 नोव्हेंबर 2015 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाबमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. येथे ते 1965 च्या युद्ध स्मारकालाही भेट देण्यासाठी आले होते.

30 ऑक्टोबर 2016 – पंतप्रधान मोदी 2016 मध्ये हिमाचलच्या किन्नौरमध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचले होते. येथे त्यांनी भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.

18 ऑक्टोबर 2017 – 2017 मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्यानंतर ते जम्मू-काश्मीरमधील गुरेझला येथे पोहोचले.

7 नोव्हेंबर 2018 – 2018 मध्ये, पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडमधील हर्षिलमध्ये इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली होती.

27 ऑक्टोबर 2019 – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2019 मध्ये नियंत्रण रेषेजवळ सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांना भेटण्यासाठी पंतप्रधान मोदी राजौरी येथे पोहोचले होते.

14 नोव्हेंबर 2020 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैसलमेरमधील लोंगेवाला पोस्टवर जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

4 नोव्हेंबर 2021 – 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळी साजरी कारण्यासाठी देशाच्या सीमारेषेवर जाऊन जवानांना भेटले होते. दरम्यान 21 ऑक्टोबर रोजी मोदी उत्तराखंड मधील केदारनाथ आणि बद्रीनाथच्या दर्शनासाठी आले होते. यानंतर त्यांनी 23 ऑक्टोबरला अयोध्येच्या दीपोत्सवालाही विशेष उपस्थिती लावली होती. अयोध्येला पाहोचल्यावर मोदींनी श्री रामांचे दर्शन घेतले.


हे ही वाचा – ब्रिटनचे बोरिस जॉन्सन पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर, ऋषी सुनक विजयाच्या दिशेने