घरदेश-विदेशभगवान शंकरांमुळेच मी काशीला आलो - नरेंद्र मोदी

भगवान शंकरांमुळेच मी काशीला आलो – नरेंद्र मोदी

Subscribe

'कदाचित मला भगवान शंकरानेच सांगितलं असावं की तू बोलतोस खूप पण जरा इकडे येऊन काम करुन दाखव', असंही मोदी यावेळी म्हणाले.

आज (शुक्रवारी) वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडोरचा कोनशिला समारंभ पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कॉरिडोअरचे भूमिपूजन झाले. यावेळी मोदी यांनी काशी विश्वनाथ मंदिरात पूजादेखील केली. या सोहळ्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल राम नाईक उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून या सोहळ्याची सर्वांनाच प्रतिक्षा होती. उपलब्ध माहितीनुसार, या काशी विश्वनाथ कॉरिडोरसाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, याच कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं. भाषणादरम्यान मोदी म्हणाले की, ‘आज मी इथे आलो ते कदाचित भगवान शंकरांमुळेच. २०१४ च्या निवडणुकीत मी बोललो होतो की मी येथे येईन पण ते शक्य झालं नाही. आज कदाचित या कामासाठीच मला भगवान शंकरांकडून बोलावण्यात आलं’. ‘कदाचित मला भगवान शंकरानेच सांगितलं असावं की तू बोलतोस खूप पण जरा इकडे येऊन काम करुन दाखव’, असंही मोदी यावेळी म्हणाले.

- Advertisement -

भगवान शंकरांच्या मुक्ततेची सुरुवात 

मोदी यावेळी म्हणाले ‘जे भगवान शंकर सध्या चारही बाजूंनी घेरले गेले आहेत त्यांच्या मुक्ततेची ही सुरुवात आहे. यासाठी मी योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारचे आभार मानतो. या कामात त्यांचे खूप सहकार्य लाभले’. ‘मला जर तीन वर्ष आधी तत्कालीन सरकारची साथ मिळाली असती तर, आज मी कदाचित उद्घाटन करताना दिसलो असतो’ असंही ते म्हणाले. मोदी म्हणाले की, ‘राजकारणात सक्रीय होण्याआधी मी काशीला आलो होतो. तेव्हापासून मला मंदिरासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटत होतं.’ यापुढे भक्त गंगास्नान केल्यानंतर थेट भगवान शंकराच्या दर्शनासाठी येऊ शकतात, असंही मोदी यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -