घरदेश-विदेशबोगद्यात पडलेला कचरा मोदींनी स्वतः उचलून कचरा पेटीत टाकला, व्हिडीओ व्हायरल

बोगद्यात पडलेला कचरा मोदींनी स्वतः उचलून कचरा पेटीत टाकला, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सतत स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाते. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यावेळी स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली जाते. मात्र, या उद्धाटनावेळी पाहणी दरम्यान त्यांना कचरा पडलेला दिसला.

दिल्लीकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याकरता प्रगती मैदानातील इंटिग्रेटेड ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाच्या (Integreted Transit Corridor Project) मुख्य बोगद्याचं आणि ५ अंडरपासचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यामुळे पूर्व दिल्ली, नोएडा आणि गाझइयाबाद येथून इंडिया गेट आणि मध्य दिल्लीच्या इतर भागांमध्ये पोहोचणं सोपं होणार आहे. दरम्यान, या उद्घाटनातील एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. (prime minister narendra modi picks up litter at the newly launched itpo tunnel in-delhi)

हेही वाचा – पालखी मार्गांसाठी ११ हजार कोटींचा निधी, नरेंद्र मोदींचे वारकऱ्यांना आश्वासन

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सतत स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाते. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यावेळी स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली जाते. मात्र, या उद्धाटनावेळी पाहणी दरम्यान त्यांना कचरा पडलेला दिसला. बोगद्यात केलेली कलाकुसर पाहताना त्यांना बोगद्यात कचरा आढळला. त्यामुळे त्यांनी स्वतःहून कचरा उचलला. थोडा अंतर चालत गेल्यावर त्यांना पुन्हा पाण्याची बॉटल दिसली. त्यांनी ती बॉटल उचलून कचरा पेटीत टाकली. त्यांचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.

हेही वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कधीही मदत घेतली नाही – अब्बास अली

- Advertisement -

दरम्यान, या बोगद्याच्या उद्घाटनावेळी मोदींनी जनतेला संबोधित केलं. तेव्हा ते म्हणाले की, की अनेक दशकांपूर्वी, भारताची प्रगती, भारतीयांची ताकद, भारताची उत्पादने, आपली संस्कृती दाखवण्यासाठी प्रगती मैदान उभारण्यात आलेलं. त्यानंतर भारत बदलला, भारताची क्षमता बदलली, गरजा अनेक पटींनी वाढल्या, पण प्रगती मैदानाची फारशी प्रगती झाली नाही.


गेल्या 8 वर्षांत आम्ही दिल्ली-एनसीआरच्या समस्या सोडवण्यासाठी अभूतपूर्व पावले उचलली आहेत. गेल्या 8 वर्षांत दिल्ली-एनसीआरमधील मेट्रो सेवा 193 किलोमीटरवरून 400 किलोमीटरपर्यंत विस्तारली आहे, असंही मोदी म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -