घर देश-विदेश PM Modi : देशातील महिलांचे मोदींने केले कौतुक, सांगितला परदेशातील 'तो' प्रसंग

PM Modi : देशातील महिलांचे मोदींने केले कौतुक, सांगितला परदेशातील ‘तो’ प्रसंग

Subscribe

आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आला. यानंतर त्यांनी भारतातील नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणातून देशातील महिलांचे कौतुक केले.

नवी दिल्ली : आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आला. यानंतर त्यांनी भारतातील नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भारतातील अनेक गोष्टींकडे सर्वांचे लक्ष वेधले. पंतप्रधानांकडून विकसित भारत बनविण्याचा संकल्प करण्यात आला असून त्यांनी यावेळी आपल्या भाषणातूनआत्मनिर्भर भारत, मणिपूर हिंसाचार, शेतकरी, महिला सक्षमीकरण, युवाशक्ती, शेजारी राष्ट्रांबद्दलचं धोरण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी पंतप्रधानांनी महिला सक्षमीकरणाबाबत बोलताना अभिमान व्यक्त केला. तसेच, देशातील महिलांसाठी ड्रोन योजना आणण्याची सरकारची तयारी असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. तर त्यांच्यासोबत परदेशात दौऱ्यावर असताना घडलेली एक प्रसंग त्यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात सांगितला. (Prime Minister Narendra Modi praised the women of the country)

हेही वाचा – पुढील वर्षी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना…, पंतप्रधान मोदी यांना विश्वास

- Advertisement -

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज देशातील महिला या सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. विज्ञान असो, तंत्रज्ञान असो किंवा अन्य क्षेत्रातही महिला पुढे आहेत. देशाच्या गावांमध्ये 2 कोटी लक्षाधीश महिला तयार करण्याचे स्वप्न आहे. आज 10 कोटी महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत. तुम्ही गावात गेलात तर तुम्हाला बँकवाली दीदी भेटेल, अंगणवाडीची दीदी भेटेल, औषध देणारी दीदी भेटेल. पण माझे स्वप्न आहे की 2 कोटी महिलांनी लखपती दीदी बनावे.

शेती क्षेत्रात तंत्रज्ञान यावे यासाठी महिला बचत गटाच्या सदस्यांना आम्ही ड्रोन चालवण्याचे, दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण देणार आहोत. अशा हजारो महिलांना भारत सरकार ड्रोन देईल. त्याची सुरुवात आम्ही 15 हजार महिला बचत गटांच्या माध्यमातून करणार आहोत, यासाठी महिलांकरिता विशेष ड्रोन योजना राबविण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केली.

- Advertisement -

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौऱ्यावर असताना त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला. मी परदेश दौऱ्यावर गेलो असताना तिथल्या एका ज्येष्ठ मंत्र्याने विचारले की, तुमच्याकडे मुली विज्ञान आणि इंजिनिअरिंगच्या विषयांचा अभ्यास करतात का? मी त्यांना म्हटले आज माझ्या देशात मुलांपेक्षा जास्त मुली विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताच्या शिक्षणात सहभागी होतात, हा किस्सा सांगत मोदी म्हणाले की, त्यांच्यासाठी ती आश्चर्याची बाब होती. हे सामर्थ्य आज माझ्या देशाचे आहे.

- Advertisment -