घरदेश-विदेशनायडूंनी सर्व भूमिका चोख बजावल्या, त्यांच्यासोबत कामाची संधी मिळाली हे माझे सौभाग्य...

नायडूंनी सर्व भूमिका चोख बजावल्या, त्यांच्यासोबत कामाची संधी मिळाली हे माझे सौभाग्य ; पंतप्रधान मोदींकडून कौतुक

Subscribe

देशाचे मावळते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा सोमवारी राज्यसभेत निरोप समारंभ पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निरोप समारंभाच्या भाषणात मावळते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या कार्याचे, युवा पिढीसोबतच्या संबंधांचे, संसद आणि संसदेबाहेरील त्यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. नायडूंनी सर्व भूमिका चोख बजावल्या, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली हे माझे सौभाग्य होते असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आम्ही सर्वजण राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी उपस्थित आहोत. या सभागृहासाठी हा खूप भावनिक क्षण आहे. सभागृहातील अनेक ऐतिहासिक क्षण तुमच्याशी फाक आत्मीयतेने जुळलेले आहे.

- Advertisement -

तुम्ही अनेकदा मी राजकारणातून निवृत्त झालो पण सार्वजनिक जीवनातून नाही असे सांगितले. त्यामुळे सभागृहाचे नेतृत्त्व करण्याची तुमची जबाबदारी आता संपतेय, पण राष्ट्र तसेच सार्वजनिक जीवनातील कार्यकर्त्यांना, माझ्यासारख्यांना तुमच्या अनुभवांचे मार्गदर्शन मिळत राहील. असही मोदी यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटले की, व्यंकय्या नायडू यांनी संसदेतील प्रत्येक सदस्यांला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांसोबत सातत्याने संवाद साधण्यासाठी त्यांची मत जाणून घेण्यासाठी ते विविध शैक्षणिक संस्थांमध्ये जात राहिले. त्यामुळे नव्या युवा पिढीसोबत त्यांचे एक घट्ट नाते निर्माण झाले आहे. युवकांना त्यांनी चांगले प्रकारे मार्गदर्शन केले, त्यामुळे युवा पिढी त्यांना भेटण्यासाठी नेहमी उत्सुक असते. यामुळे सर्व संस्थांमध्ये त्यांची लोकप्रियता अधिक वाढत आहे. तरुणांनी नायडू यांच्याकडून कौशल्य शिकलं पाहिजे. व्यंकय्या नायडू यांनी संसदेच्या बाहेर त्यांनी दिलेल्या 25 टक्के भाषणं ही युवा पिढीसाठी होती.

- Advertisement -

त्यांनी वेगवेगळ्या भूमिका पार पडतल्या. यातील अनेक भूमिकांमध्ये मला त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी मिळाली, हे माझे सौभाग्य आहे. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुमची वैचारिक बांधिलकी असो, आमदार म्हणून तुमचे काम असो, खासदार म्हणून सभागृहातील तुमचं काम असो, पक्षप्रमुख म्हणून तुमचे नेतृत्व, मंत्रिमंडळातील तुमची मेहनत, आणि राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती म्हणून तुमचे काम असो, सर्व पातळ्यांवर तुम्ही उत्तम आणि निष्ठेने काम केलं आहे, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा अनुभव देशाला मिळत राहील. तुम्ही सर्वच भूमिका चोख बजावल्यात.असही मोदी म्हणाले.

भारतीय जनता पक्षासाठीचे त्यांचे सांग्रहिक कौशल्य आणि नेतृत्व कौशल्य त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून घेतलेली मेहनत, काही तरी नवीन शिकण्याची जिद्द आणि त्यातून मिळालेले यश देशासाठी मोलाचे ठरले. उपराष्ट्रपती आणि संसदेतील सभापतीच्या भूमिकेत तुमची गरिमा आणि निष्ठा दिसली, अनेक जबाबदारांमध्ये मोठ्या जिद्देने काम करताना पाहिले आहे. कोणत्याही कामाला त्यांनी कधी ओझे मानले नाही. प्रत्येक कामात जीव ओतून देण्याचा प्रयत्न केला. अशा शब्दात त्यांनी नायडू यांचे कौतुक केले.

देश आता पुढील 25 वर्षांच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. आम्ही तुमच्याकडून लोकशाहीबद्दल खूप काही शिकू शकतो, तुम्ही प्रत्येक जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडता. तुमची शब्द प्रतिभा नेहमीच खुल येते ज्यासाठी तुम्हाला ओळखले जाते. यातील तुमच्या वन लाइनर विक लाइनर होत्या, आणि विन लाइनरही होत्या. ज्यानंतर काही बोलण्याची गरज पडत नव्हती. असही मोदी म्हणाले.

नायडूजींची प्रत्येक चर्चा अतुलनीय आहेत. व्यंकय्या नायडू यांच्यासोबत काम करणे हा आमचा बहुमान आहे. तुमच्या मानकांमध्ये मला लोकशाहीची परिपक्वता दिसते. तुम्ही केवळ संवाद, संपर्क आणि समन्वयातून सभागृह चालवले नाही तर ते फलदायीही केले. जेव्हा-जेव्हा सभागृहात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली, त्या वेळी तुम्ही निर्णायक भूमिका बजावली, असही मोदी म्हणाले.

आपण यावेळी असा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत, जो देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सभापती आणि पंतप्रधान सर्व लोक स्वतंत्र्य भारतात जन्मलेले आहे. आपण सर्व अगदी सामान्य परिवारातून आलो आहोत. मला वाटते त्याचे प्रतिकात्मक महत्त्व आहे. असही मोदी म्हणाले.


भारताच्या इतिहास पहिल्यांदाच अमेरिकन गायिका मेरी मिलबेन होणार स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -