घरदेश-विदेशशबरीमला मंदिर प्रकरणी केरळ सरकारची भूमीका लाजिरवाणी - मोदी

शबरीमला मंदिर प्रकरणी केरळ सरकारची भूमीका लाजिरवाणी – मोदी

Subscribe

केरळ येथील सभे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शबरीमला मंदिर प्रकरणावरुन केरळ सरकारवर टीका केली आहे. केरळच्या कोल्लम जिल्ह्यामध्ये मोदींची सभा झाली. या सभे दरम्यान त्यांनी असे म्हटले आहे की, शबरीमला मंदिर प्रकरणी केरळ सरकारने घेतलेली भूमिका लाजिरवाणी आहे. केरळ सरकारकडून आम्ही अशा द्वेषाच्या व्यवहाराची अपेक्षा केली नव्हती. केरळमधील डाव्या पक्षांच्या सरकारने महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत घेतलेली भूमिका लाजिरवाणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केरळ सरकारने घेतलेली भूमिका इतिहासात कोणत्याही सरकार अथवा पक्षाकडून घेण्यात आलेल्या भूमिकापेक्षा सर्वात लाजिरवाणी असल्याची टीका मोदींनी केली आहे. दरम्यान त्यांनी शबरीमला मंदिर प्रकरणी भारतीय जनता पक्ष संस्कृतीसोबत असल्याचे सांगितले.

- Advertisement -

द्वेषपूर्ण वागणुकीची अपेक्षा नव्हती

भाषणावेळी मोदींनी एलडीएफ सरकारवर निशाना साधत म्हटले आहे की, आम्हाला माहिती आहे की, कम्युनिस्ट लोकं भारताचा इतिहास, संस्कृती आणि आध्यात्माचा सन्मान करीत नाहीत. मात्र, कोणालाही असे वाटले नव्हते की त्यांच्या मनात ऐवढी द्वेषाची भावना आहे. त्यांच्याकडून अशा प्रकारे द्वेषपूर्ण वागणुकीची अपेक्षा केली नव्हती. दरम्यान, विरोधी पक्ष यूडीएएफ आणि काँग्रेस वेगळे नाहीत अशी देखील टीका त्यांनी केली आहे.

- Advertisement -

शबरीमाला प्रकरणी भाजपची भूमिका स्पष्ट

काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले, काँग्रेस संसदेत वेगळेच काही बोलतात आणि शबरीमला प्रकरणावर वेगळीच भूमीका घेतात. या प्रकरणावर आमची भूमीका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. आमचा पक्ष जे बोलतो ते करुन दाखवतो असे मोदींनी म्हटले आहे. पुढे त्यांनी असे म्हटले आहे की, कम्युनिस्ट आणि काँग्रेस लैंगिक आणि सामाजिक न्यायाच्या समर्थनाचा दावा करतात. मात्र त्यांची भूमिका त्या उलट असते. एनडीए ट्रिपल तलाक संपवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्याला काँग्रेस आणि कम्युनिस्टवाले विरोध करत आहेत.

यूडीएफ आणि एलडीएफ एकाच नाण्याच्या दोन बाजू

यूडीएफ आणि एलडीएफ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे फक्त नावाने वेगवेगळ्या असल्याची टीका मोदींनी केली आहे. मात्र भ्रष्टाचार – जातियवाद – संप्रदायिकता यामध्ये एकच आहेत. हे केरळच्या संस्कृतीला बघवण्यामध्ये एकसारखे आहेत. त्याचसोबत राजकिय हिंसाचार प्रकरणामध्ये देखील ते एकसारखे असल्याची टीका मोदींनी केली आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -