Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कोरोनाला हरवायला लसीकरण गरजेच, दुसरा डोस घेत पंतप्रधानांचे जनतेला आवाहन

कोरोनाला हरवायला लसीकरण गरजेच, दुसरा डोस घेत पंतप्रधानांचे जनतेला आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय बनावटीच्या कोरोना लसीचा घेतला दुसरा डोस

Related Story

- Advertisement -

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवारी) सकाळी कोरोना लसीचा दुसरा डोस दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन घेतला आहे. कोरोना लसीकरणाचा पहिला डोस पंतप्रधान मोदींनी १ मार्च २०२१ रोजी एम्स रुग्णालयात घेतला होता. पंतप्रधान मोदींनी कोरोना लस घेतल्याचे ट्विट करत सांगितले आहे. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपल्याकडे लस हाच पर्याय आहे. त्यामुळे तुम्ही जर लस घेण्यास पात्र असाल तर आपल्या लसीचा डोल लवकरात लवकर घ्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आह. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारत बायोटेक या स्वदेशी कंपनीने बनवेल्या कोव्हॅक्सिन (COVAXIN) लसीचा डोस देण्यात आला आहे. मोदींनी पहिला डोस याच कंपनीचा घेतला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना लसीचा डोस दोन परिचारिकांनी दिला. या परिचारिकांमध्ये पी. निवेदा ही पद्दुचेरीची आहे तर नीशा शर्मा पंजाब येथील आहे. मोदींना पहिला कोरोना लसीचा डोस पी. निवेदा यांनीच दिला होता. तर दुसरा डोस पंजाबच्या नीशा शर्मा यांनी दिला आहे.

जनतेल लस घेण्याचे आवाहन

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला कोरोना लस घेण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटले आहे की, मी आज एम्स (AIIMS) रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. कोरोनाला रोखण्यासाठीच्या पर्यायांमधील लसीकरण हा एक पर्याय आहे. जर तुम्ही कोरोना लस घेण्यास पात्र असाल तर cowin.gov.in या वेबसाईटवर आपले नाव नोंदवा आणि कोरोना लसीचा डोस घ्या.

- Advertisement -

देशात आतापर्यंत ९ करोडपेक्षा जास्त लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे. देशात १ एप्रिलपासून कोरोना लसीकरणाचा तीसरा टप्पा सुरु झाला असून या टप्प्यामध्ये ४५ वयोगटापेक्षा अधिक वय असलेल्यांना कोरोना लसीचा डोस दिला जात आहे. तसेच वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २५ वर्षांवरील तरुणांनाही कोरोना लस देण्याची द्यावी अशी मागणी महाराष्ट्रासह काही राज्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

- Advertisement -