Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona Vaccination: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोनाची लस टोचून

Corona Vaccination: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोनाची लस टोचून

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्याकरिता १६ जानेवारीपासून लसीकरणाची मोठी मोहीम देशभरात सुरू आहे. कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला असून आजपासून (सोमवार) दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतल्याचे समोर आले आहे. नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लसीचा पहिला डोस टोचून घेतला आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ट्विट करून म्हणाले की, ‘कोरोना लसीचा पहिला डोस मी एम्स रुग्णालयात घेतला. कोरोना विरुद्धातील जागतिक लढाईला बळकट करण्यासाठी आपल्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी जे कार्य केले ते उल्लेखनीय आहे. मी लस घेण्यासाठी पात्र असलेल्या सर्वांना आवाहन करतो. एकजुटीने आपण भारत कोरोनामुक्त करुया!’

- Advertisement -

हेही वाचा – Corona In Maharashtra: राज्यात २४ तासांत ८,२९३ रुग्णांची वाढ, ६२ जणांचा मृत्यू

माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे. सर्वसामान्यांमध्ये लसीबाबत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मोदी आणि इतर नेते लस घेणार असल्याचे म्हटले जात होते. अखेर आज मोदींनी कोरोनाची लस घेतली. मोदीनंतर आता देशातील अनेक बडे नेते जसे की गृहमंत्री अमित शहा, इतर राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि मंत्रिमंडळातील सदस्य लस घेणार आहेत.
कोविड-१९ इंडिया ट्रॅकरनुसार, देशात आतापर्यंत १ कोटी ११ हजार १२ हजार ५६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतपर्यंत १ लाख ५७ हजार १९५ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ७ लाख ८४ हजार ५६८ जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या १ लाख ६५ हजार ७१५ जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत १ कोटी ४३ लाख १ हजार २६६ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

हेही वाचा – Corona Update: मुंबईकरांनो चिंता वाढली! पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या हजार पार!


 

- Advertisement -