घरदेश-विदेशआज पंतप्रधान करणार 'मन की बात', 99व्या भागाचे थोड्याच वेळात प्रसारण

आज पंतप्रधान करणार ‘मन की बात’, 99व्या भागाचे थोड्याच वेळात प्रसारण

Subscribe

देशातील जनतेसोबत संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बात" ही संकल्पना राबविली. या मन की बातचा ९९ वा भाग आज थोड्याच वेळात म्हणजे ११ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.

जनतेसोबत संवाद साधता यावा, त्यांना देशात होणाऱ्या विकासाची माहिती देता यावी, यासाठी केंद्र सरकारकडून “मन की बात” नावाची संकल्पना राबविण्यात आली. या संकल्पनेच्या अंतर्गत पंप्रधान नरेंद्र मोदी हे रेडिओच्या माध्यमातून देशातील जनतेला संबोधित करत होते. पंतप्रधान मोदी यांचा हा “मन की बात” कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओवर प्रसारित केला जातो. आज या मन की बात कार्यक्रमाचा ९९ वा भाग प्रसारित करण्यात येणार आहे.

३ ऑक्टोबर २०१४ ला विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी हा कार्यक्रम सुरु केला गेला. २०२३ मधील हा ३रा भाग आहे. तसेच मागील महिन्यात २८ फेब्रुवारीला या कार्यक्रमाचा ९८ वा भाग प्रसारित करण्यात आला होता. मागील भागामध्ये मोदींनी “एकता दिवस”च्या निमित्ताने स्पर्धेच्या तीन विजेत्यांची घोषणा केली होती. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या संपूर्ण नेटवर्कवर, ऑल इंडिया रेडिओ न्यूज वेबसाईट आणि न्यूजोनियर मोबाईल अॅपवर प्रसारित केला जातो.

- Advertisement -

नवीन वर्षाच्या पहिल्या मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना अनेक महत्वाची आवाहने केली होती. त्यावेळी त्यांनी देशातील जनतेला आरोग्य आणि आहाराबाबत जागरूकता बाळगण्याचे आवाहन केले होते. तर त्याच कार्यक्रमातून त्यांनी ओडिशा राज्यातील बाजरीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे कोतुक करत बाजरी खाणे शरीरासाठी किती लाभदायक आहे, हे सांगितले होते.

दरम्यान, मन की बात हा कार्यक्रम झाल्यानंतर आकशवाणीकडून त्या-त्या क्षेत्रात क्षेत्रीय भाषांनुसार कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येते. तर १०० व्या भागासाठी भाजपकडून या कार्यक्रमासाठी विशेष तयारी करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा १०० वा भाग हा ३० एप्रिलला रविवारी प्रसारित होईल. या कार्यक्रमासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून अथवा जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेच्या अंतर्गत गावखेड्यामध्ये राहणाऱ्या लोकांना हा कार्यक्रम ऐकता यावा यासाठी विशेष सोया करून देण्यात येत असते.

- Advertisement -

हेही वाचा – उद्धव ठाकरेंची आजची मालेगावमधील सभा का आहे महत्वाची? वाचा..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -