घरताज्या घडामोडीपंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज हिमाचल दौरा, शेर आया शेर आया म्हणत लोकांकडून...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज हिमाचल दौरा, शेर आया शेर आया म्हणत लोकांकडून जंगी स्वागत

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज हिमाचल प्रदेशातील उना दौऱ्यावर आहेत. यावेळी नरेंद्र मोदींचे लोकांनी जंगी स्वागत केले. देखो-देखो कौन आया, शेर आया शेर आया.., अशा घोषणांनी नरेंद्र मोदींचं लोकांनी जंगी स्वागत केलं. तसेच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

- Advertisement -

मोदींनी उना जिल्ह्यातील अंब अंदौरा येथून नवी दिल्लीसाठी चौथ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी ट्रेनमधून प्रवासही केला आणि लोकांना हात दाखवून त्यांना अभिवादन केलं. ट्रेनमधून उतरल्यानतंर मोदी लोकांमध्ये पोहोचले. यावेळी मोदींच्या सुरक्षेसाठी सुरक्षा दल सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही व्हिडीओतून दिसून येत आहे.

वंदे भारत ट्रेन बुधवार सोडून आठवड्याच्या सहा दिवस धावेल. अंबाला, चंदीगड, आनंदपूर साहिब आणि उना येथे थांबणार आहे. ही ट्रेन फक्त ५२ सेकंदात १०० किमी प्रतितास वेग पकडते. या ट्रेनच्या प्रारंभामुळे हिमाचल प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. तसेच येथील लोकांना प्रवास देखील आनंददायी होणार आहे.

- Advertisement -

मोदींनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रवाना झालेली वंदे भारत ट्रेन ही पूर्वीपेक्षा सुधारित आवृत्ती आहे. जी कमी कालावधीत उच्च गती गाठण्यास सक्षम आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मोदींनी उना जिल्ह्यांनी बल्क ड्रग पार्कची पायाभरणीही केली आहे.


हेही वाचा :शाळकरी मुलींकडे पाहून आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या टॅक्सी चालकाला अटक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -