घरट्रेंडिंगभारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी 'Air India' मध्ये करत होते पायलटची नोकरी...

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी ‘Air India’ मध्ये करत होते पायलटची नोकरी ; फक्त इतकाच होता पगार

Subscribe

जवाहरलाल नेहरु यांनी या खाजगी कंपनीला शासनात विलीन केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही कंपनी पुन्हा एकदा टाटा समूहाकडे सोपवली. इंदिरा गांधी, मोरारजी देसाई आणि मनमोहन सिंग यांनीही एअर इंडियाच्या इतिहासात नवं पान लिहिलं आहे. मात्र देशातील एक प्रधानमंत्री असेही होते ज्यांनी एअर इंडियामध्ये पायलटची नोकरी केली होती.

देशाच्या आतापर्यंतच्या अनेक पंतप्रधानांनी आपापल्या परीने एअर इंडियामध्ये अनेक बदल करत इतिहास घडवला आहे. जवाहरलाल नेहरु यांनी या खाजगी कंपनीला शासनात विलीन केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही कंपनी पुन्हा एकदा टाटा समूहाकडे सोपवली. इंदिरा गांधी, मोरारजी देसाई आणि मनमोहन सिंग यांनीही एअर इंडियाच्या इतिहासात नवं पान लिहिलं आहे. मात्र देशातील एक प्रधानमंत्री असेही होते ज्यांनी एअर इंडियामध्ये पायलटची नोकरी केली होती. नेहरु आणि गांधी परिवारातील देशातील शेवटे प्रधानमंत्री राजीव गांधी हे राजकारणात एंट्री करण्यापूर्वी पायलट होते.

डेहराडूनमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर माजी पंतप्रधान राजीव गांधी परदेशात ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी गेले, परंतु तेथे त्यांना शिक्षणात काही रस निर्माण झाला नाही. दिल्लीला परत आल्यानंतर त्यांनी दिल्ली फ्लाइंग क्लबमधून पायलट होण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना एअर इंडियामध्ये नोकरी मिळाली. बहुतेकदा ते दिल्ली-जयपूर मार्गावर उड्डाण करायचे. ही नोकरी करताना पगार हा ५,००० रुपये होता. त्यावेळी त्यांच्या आई इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या, पण तरीही राजीव गांधींना पायलटच्या नोकरीला पसंती दिली. राजीव गांधी यांनी त्यांचे भाऊ संजय गांधी यांच्या निधनानंतर राजकारणात प्रवेश केला. त्यामुळे पायटलच्या नोकरीमधून त्यांनी काढता पाय घ्यावा लागला.

- Advertisement -

राजीव गांधीप्रमाणे अनेक नेत्यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी पायलटची नोकरी केली होती. त्यापैकीच एक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश्वर प्रसाद सिंह बिधुरी यांना त्यांच्या खऱ्या नावाने क्वचितच कोणी ओळखत असेल. ‘पायलट’ ही त्याची ओळख आहे. राजेश पायलट हे राजस्थानचे नेते होते आणि राजकारणात येण्यापूर्वी ते भारतीय हवाई दलात पायलट होते. १९६६ आणि १९७२ च्या युद्धात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक हे देखील प्रशिक्षित पायलट होते. त्यांनी दिल्ली फ्लाइंग क्लबमधूनच प्रशिक्षण घेतले आणि स्वातंत्र्यापूर्वी रॉयल एअर फोर्सचा एक भाग होता. दुसर्‍या महायुद्धादरम्यान त्यांनी ब्रिटीश सैन्याच्या वतीने बर्मामधील जपानी सैन्याविरुद्ध अनेक मोहिमा पूर्ण केल्या. याशिवाय अनेक मोहिमा पूर्ण केल्या.


हे ही वाचा – आता Ration Card वर मिळणार स्वस्तात पेट्रोल! ‘या’ लोकांना होणार फायदा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -