काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे. यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य करत राहुल गांधींनी अदानींवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे भाजपनं षडयंत्र रचलं, असं मोठं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने राहुल गांधींवर ज्याप्रकारे कारवाई केली आहे. त्याप्रकारचं उत्तम उदाहरण तुम्हाला लोकशाहीत सापडणार नाही. भाजपचं सरकार विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी का घाबरले आहेत?, त्या मुद्दयांना काँग्रेस जनतेच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. हे मुद्दे थांबणारे नाहीत, तर २०२४ च्या निवडणुकीतही हेच मुद्दे उपस्थित केले जातील, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
राहुल गांधी जी ने संसद में अडानी महाघोटाले पर प्रश्न उठाया और पूछा कि प्रधानमंत्री और अडानी के क्या संबंध हैं?
इसके बाद से ही भाजपा ने राहुल गांधी जी की सदस्यता को रद्द करवाने का षड्यंत्र रचा।
: @prithvrj जी pic.twitter.com/ABssY4B9CV
— Congress (@INCIndia) March 29, 2023
अदानींवर प्रश्न विचारल्यामुळे खासदारकी रद्द
राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. याचे कारण राहुल गांधी यांनी मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांवर प्रश्न विचारला. 20 हजार कोटींच्या मोजणीबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. हे सर्व प्रश्न विचारले जाऊ नये, म्हणूनच राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे, परंतु आम्ही प्रश्न विचारत राहू, असं देखील चव्हाण म्हणाले.
भारत जोडो यात्रेला भाजप घाबरलं
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला संपूर्ण जनतेतून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळालं आहे. यावेळी सुद्धा भाजपने या यात्रेत आडकाठी करण्याचा प्रयत्न केला. परंतु गर्दीसमोर काही करता आले नाही. अशा स्थितीत भाजप घाबरला होता. जेव्हा राहुल गांधी परदेशात गेले होते. तेथे त्यांनी काही व्याख्याने दिली, त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली. गौतम अदानी ही जगातील सर्वात मोठी फसवणूक करणारी व्यक्ती आहे. कारण इतक्या लवकर ते साध्या उद्योगपतीतून जगातील दुसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती कशी बनू शकते. त्यांना भारत सरकारच्या नेतृत्वाचा आशीर्वाद आहे, असंही चव्हाण म्हणाले.
हेही वाचा : 1 एप्रिलपासून UPI पेमेंट महागणार, सामान्य लोकांच्या व्यवहारावर काय होणार परिणाम?