घरताज्या घडामोडीकाँग्रेसचे देशव्यापी आंदोलन! राहुल आणि प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात

काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन! राहुल आणि प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर, काँग्रेस नेते सध्या विजय चौकात धरणे धरून बसले आहेत. त्यामुळे पोलिसांनी जिल्ह्यात कलम १४४ लागू केले आहे.

महागाई आणि बेकारीच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेसतर्फे आज सकाळपासून देशभर आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तर, काळे कपडे परिधान करून काँग्रेस खासदार संसदेत दाखल झाले आणि तिथे त्यांनी निदर्शने केली. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर, काँग्रेस नेते सध्या विजय चौकात धरणे धरून बसले आहेत. त्यामुळे पोलिसांनी जिल्ह्यात कलम १४४ लागू केले आहे. (Priyanka and Rahul gandhi detained by delhi congress)

हेही वाचा – ७० वर्षांत कमावलेलं आठ वर्षांत गमावलं, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

- Advertisement -


काँग्रेसने आज जोरदार आंदोलन छेडले. यावेळी काँग्रेसच्या खासदारांसोबत पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. पोलिसांनी मारहाणदेखील केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी म्हटले की, महागाई प्रमाणापेक्षा जास्त वाढली आहे. सरकारला काही करावं लागेल. आम्ही यासाठीच आंदोलन करत आहे.

हेही वाचामहागाई आणि बेकारीच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक; काळे कपडे परिधान करून खासदार संसदेत

- Advertisement -

आज पत्रकार परिषद घेत राहुल गांधी म्हणाले की, “सर्वांत जास्त बेरोजगारी भारतात आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ होत आहे. मात्र, अर्थमंत्र्यांना हे दिसत नाहीय. कोणत्याही गावात आणि शहरात गेलात तर तिथले लोक सांगतील किती महागाई वाढली आहे ते. मात्र सरकारला हे दिसत नाहीय.”

हेही वाचा – काँग्रेसचा एल्गार; मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी, संजय निरुपमसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात

तर मुंबईत काँग्रसेचे नेते संजय निरुपम यांना वर्सोवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे , वर्षा गायकवाड, मोहन जोशी, देवानंद पवार, प्रमोद मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -