Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश ...आणि प्रियांका चतुर्वेदींनी राहुल गांधीना लिहीले भावुक पत्र

…आणि प्रियांका चतुर्वेदींनी राहुल गांधीना लिहीले भावुक पत्र

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि मीडिया सेलच्या समन्वयक प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेस पक्ष सोडताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना एक भावुक पत्र लिहिले आहे.

Related Story

- Advertisement -

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि मीडिया सेलच्या समन्वयक प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. प्रियंका यांनी काँग्रेसच्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र त्यांनी काँग्रेस सोडताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना एक भावुक पत्र लिहिले आहे.

काय लिहिले पत्रात

प्रियांका चतुर्वेदींनी राहुल गांधींना लिहिल्या भावुक पत्रात त्या म्हणाल्या आहेत कि, ‘काँग्रेस नेहमी स्त्रिच्या मान, सन्मान आणि सुरक्षेविषयी बोलत असते. मात्र या पार्टीमधील काही नेत्यांमधून ते दिसून येत नाही. तसेत माझ्याविषयी ज्यांनी लाज वाटणारे बोले गेले. तसेच माझ्या बाबतीत काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून एक घटना घडली आहे. मात्र त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत त्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेऊन प्रत्येक नेत्याची पक्षाला गरज आहे, असे सांगण्यात आले. त्याचवेळी मी या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हे पत्र लिहिताना मला फार वाईट वाटत आहे. कारण गेल्या १० वर्षापूर्वी मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी मला या पक्षाची विचारधारा पटली होती’.

सन्मानची अपेक्षा नाही केली

- Advertisement -

प्रियांका चतुर्वेदींनी सांगितले आहे कि, मी केव्हाच मान- सन्मानाची अपेक्षा केली नाही. माझ्या पक्षाचा सन्मान तोच माझा सन्मान मी मानत होते. मात्र काही दिवसांपूर्वी जे माझ्याबाबतीत झाले आहे त्यावरुन असे दिसत आहे कि माझी या पक्षात गरज नसून पक्षाला माझे महत्त्व राहिलेले नाही. त्यानंतर मी हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि अशा ठिकाणी गेले त्याठिकाणाहून मी पुन्हा या पक्षात येऊ शकत नाही.

माझी बदनामी केली गेली

प्रियंका चतुर्वेदींनी पत्रात लिहिले आहे कि, गेल्या १० वर्षापूर्वी मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी माझी अनेका बदनामी करण्यात आली होती. तसेच माझ्या मुलांना देखील वाईट बोले जात होते. तसेच मला अनेकदा धमक्या देखील देण्यात आल्या होत्या. यामुळे मलाच नाही तर माझ्या कुटुंबाला देखील प्रचंड त्रास झाला आहे.

- Advertisement -