घरदेश-विदेशप्रियंका चोप्राचा मिस वर्ल्डचा किताब वादात; आयोजकांच्या फेव्हरमुळे..., प्रतिस्पर्धीचा आरोप

प्रियंका चोप्राचा मिस वर्ल्डचा किताब वादात; आयोजकांच्या फेव्हरमुळे…, प्रतिस्पर्धीचा आरोप

Subscribe

प्रियंका चोप्रा खूप दिवसांनी मुंबईत परतली आहेत. लैलानी हिच्या या दाव्यांवर ती काही प्रतिक्रिया देतेय का याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून आहे. 

नवी दिल्ली – बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण करणारी प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. २००० साली मिळालेला मिस वर्ल्डचा (Miss World 2000) किताब तिने वशेलीगिरी करत मिळवला असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात येतोय. ‘मिस बार्बाडोस २०००’ विजेती लैलानी हिने प्रियंकावर हे आरोप केले आहेत. तिने तिच्या युट्यूब चॅनेलवर व्हिडीओ अपलोड करून प्रियंकावर आरोप केले आहेत. मिस वर्ल्ड २००० साठी प्रियंकाला आयोजकांनी फेव्हर दिल्यानेच ती विजयी ठरली असा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे.

हेही वाचा – 3 वर्षानंतर भारतात परतलेल्या प्रियंका चोप्राने मुंबईतील मरिन ड्राइव्ह केली मौजमस्ती; व्हिडीओ व्हायरल

- Advertisement -

मिस युएसए २०२२ च्या वादाचा संदर्भ देत लैलानी हिनेही २००० साली तिच्यावर अन्याय झाल्याच म्हटलं आहे.. लैलानी म्हणाली की, मिस वर्ल्डमध्येही माझ्याबाबतीत असंच घडलं होतं. मी मिस बार्बाडोस होते. मी जेव्हा त्या स्पर्धेत गेले तेव्हा मला भारताकडून निवडण्यात आलं होतं. १९९९ सालीही भारताकडूनच मिस वर्ल्ड निवडण्यात आली होती. तेव्हा या शोचे स्पॉन्सर भारतीय कंपनी झी टीव्ही होती. २००० च्या मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी प्रियंकाचा गाऊन चांगल्याप्रकरे डिझाइन करण्यात आला होता. तिला आपल्या घरातच जेवण मिळायचं. तिचे फोटो पेपरात छापून यायचे. दुसरीकडे आमचे ग्रुप फोटो काढले जायचे, असा आरोप तिने केला आहे.


ती तिच्या त्वचेसाठी काही स्किन टोन क्रीम वापरत होती, जे खूपच विचित्र होते. मात्र, या क्रीमचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे तिची त्वचा आणखी खराब झाली. त्यामुळे प्रत्यक्ष निकालावेळी तिने पूर्ण कपडे घातले होते. ती मेघन मार्कलची जिवलग मैत्रीण आहे म्हणून तिला पसंती मिळाली. याशिवाय लैलानी यांनी आणखी गंभीर आरोप केले.

- Advertisement -

दरम्यान, प्रियंका चोप्रा खूप दिवसांनी मुंबईत परतली आहेत. लैलानी हिच्या या दाव्यांवर ती काही प्रतिक्रिया देतेय का याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -