घरदेश-विदेशप्रियंका गांधी इमोशनल ब्लॅकमेलर; काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पोस्टरबाजी

प्रियंका गांधी इमोशनल ब्लॅकमेलर; काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पोस्टरबाजी

Subscribe

रायबरेलीमध्ये काँग्रेसच्या प्रियंका गांधींविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. प्रियंका गांधी लापता, प्रियंका गांधी इमोशनल ब्लॅकमेलर असल्याच्या आशयाचे पोस्टर रायबरेलीत झळकवण्यात आले आहेत.

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात म्हणजे रायबरेली मतदारसंघातच सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधीच्या विरोधात स्थानिकांकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीमधील प्रियंका गांधीला इमोशनल ब्लॅकमेलर असे म्हटले आहे. प्रियंका वाड्रा लापता झाल्या असल्याचे या पोस्टरवर लिहिले आहे. हो पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरला असून यामुळे रायबरेलीमध्ये राजकारण तापले आहे.

काँग्रेसतर्फे प्रियंका यांचे नाव पुढे

या पोस्टरबाजीमुळे स्थानिकांकडून नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. हरचंदपूर जिल्ह्यातील रेल्वे अपघात आणि उंचाहारमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतरही प्रियंका गांधींनी घटनास्थळी भेट न दिल्याने स्थानिकांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे. सोनिया गांधी यांच्यानंतर तसंच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रायबेरली मतदारसंघातून काँग्रेसतर्फे प्रियंका यांचे नाव पुढे येत आहे. तरी देखील, प्रियंका यांचे या मतदारसंघाकडे असलेलं दुर्लक्ष पाहाता, स्थानिकांनी राग व्यक्त करत प्रियंकाला या पोस्टर्सद्वारे टार्गेट केले आहे.

- Advertisement -

राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली

रायबरेली शहराच्या त्रिपुला चौराहेपासून ते हरदासपूरपर्यंत तर शहराच्या गांधी आश्रमपासून सर्वच ठिकाणी पोस्टरबाजी पहायला मिळत आहे. या पोस्टरवर ‘अंखियां थक गई पथ निहार, आजा रे परदेशी बस एक बार…, मॅडम प्रियंका वाड्रा लापता, इमोनेशनल ब्लैकमेलर असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे एका रात्रीत रायबरेलीमध्ये झळकलेल्या या पोस्टरबाजीमुळे चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांनी या पोस्टरबाजी करणाऱ्यांना ‘गंदी हरकत’ असे संबोधले आहे. तसेच ही पोस्टरबाजी म्हणजे विरोधकांचे कटकारस्थान असल्याचेही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -