पंतप्रधानांनी देशाची संपत्ती ‘मित्रां’ना विकून टाकली, प्रियंका गांधी यांचा आरोप

UP Election 2022 UP Election 2022 priyanka gandhi release congress candidates and gave chance to unnao rape victim girl mother ticket

नवी दिल्ली : काँग्रेसने आज महागाई, बेकारी आणि जीएसटी या मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसतर्फे देशभरात आंदोलन करण्यात आले. राजधानी दिल्लीतील आंदोलनात काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली.

नॅशनल हेराल्ड मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महागाई आणि बेकारीच्या मुद्द्यावर आंदोलन केले. पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले होते. केंद्र सरकार जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला.

जनता महागाईने त्रस्त आहे. पण सरकारमधील लोकच महागाई दिसत नसल्याचे सांगत आहेत. त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तर, आम्हाला रोखले जाते. विरोधकांचा आवाज दडपून टाकू शकतो, असे केंद्र सरकारला वाटते. पोलीस बळ पाहून आम्ही तडजोड करू असे त्यांना वाटते, असे सांगून प्रियंका गांधी म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची संपत्ती आपल्या ‘मित्रां’ना विकून टाकली आहे.

प्रियंका गांधी आक्रमक
तत्पूर्वी, प्रियंका गांधी पक्षाच्या मुख्यालयातून बाहेर आल्यावर त्यांना पोलिसांनी रोखले. तेव्हा त्यांनी बॅरिकेट्सवर चढून पोलिसांचे कडे तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांना त्यांना पुढे जाऊन दिले नाही. त्यामुळे त्यांनी तिथेच ठिय्या दिला. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले.