घरताज्या घडामोडीशेतकऱ्यांना आंदोलनजीवी कोणी म्हटलं होतं? असंसदीय शब्दांच्या यादीवरून प्रियंका गांधी संतापल्या

शेतकऱ्यांना आंदोलनजीवी कोणी म्हटलं होतं? असंसदीय शब्दांच्या यादीवरून प्रियंका गांधी संतापल्या

Subscribe

जुमलाजीवी शब्दांना विरोध करणाऱ्या सरकारला त्यांनी प्रश्न विचारला आहे की, देशाच्या अन्नदात्यासाठी आंदोलनजीवी शब्दाचा प्रयोग संसदेत कोणी केला होता?

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच असंसदीय शब्दांची यादी (List of Unparliamentary Words) जाहीर करण्यात आली आहे. यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात रोष व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी (Congress Leader Priyanka Gandhi) यांनीही केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. जुमलाजीवी शब्दांना विरोध करणाऱ्या सरकारला त्यांनी प्रश्न विचारला आहे की, देशाच्या अन्नदात्यासाठी आंदोलनजीवी शब्दाचा प्रयोग संसदेत कोणी केला होता? (Priyanka Gandhi on unparliamentary words)

हेही वाचा – द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची वज्रमूठ

- Advertisement -

केंद्र सरकारने लादलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी जवळपास वर्षभर आंदोलन केले होते. हे कृषी कायदे मागे घेत नाहीत तोवर शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले. मात्र, या शेतकऱ्यांविरोधात केंद्र सरकारने आंदोलनजीवी अशा शब्दांत संसदेत हल्लाबोल केला होता. त्यावरून प्रियंका गांधी यांनी असंसदीय शब्दांबाबत केंद्र सरकारवर टीका केली आहे.
सरकारची इच्छा आहे की ते भ्रष्टाचाराला भ्रष्ट न म्हणता मास्टरस्ट्रोक म्हणा. २ कोटी रोजगार, शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न सारखे वाक्य सरकारने म्हटली की त्यांना जुमलाजीवी म्हणायचं नाही, त्यांना थँक्यू बोलायचं. पण देशाच्या अन्नदाता शेतकऱ्यांबद्दल संसदेत आंदोलनजीवी असा शब्दप्रयोग कोणी केला होता?

हेही वाचा – श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षेंची भागम भाग, मालदीवहून सिंगापूरकडे

- Advertisement -

लोकसभा सचिवालयाने ‘असंसदीय शब्द 2021’ या नावाने अशा शब्द आणि वाक्यांची यादी तयार केली आहे, जे संसदेत चुकीचे आणि असंसदीय मानले जातील. या अंतर्गत जुमलाजीवी, लॉलीपॉप, देशद्रोही, मगरमचके अश्रू, जयचंद, शकुनी, भ्रष्ट अशा अनेक शब्दांवर बंदी घालण्यात आली आहे. हे निवडक शब्द सभागृहाच्या कामकाजात समाविष्ट केले जाणार नाहीत. या शब्दांची यादी सर्व खासदारांना पाठवण्यात आली आहे.

हेही वाचा – संसदेत आता जुमलाजीवी, कोरोना स्प्रेडर, जयचंद अशा डझनभर शब्दांवर बंदी; पाहा पूर्ण लिस्ट

दरम्यान, यावरून तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार महुआ मोइत्रा यांनीही ट्विट केले आहे की, बसा, बसा, प्रेमाने बोला. असंसदीय शब्दांच्या नव्या यादीत ‘संघी’ हा शब्द नाही. भाजप कसा देशाचा नाश करत आहे, याचे वर्णन करण्यासाठी विरोधकांकडून वापरले जाणारे शब्द सरकार थांबवत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. आता ‘सत्य (सत्य)’ देखील असंसदीय मानणार का?, असा सवाल मोईत्रा यांनी विचारला आहे.

असंसदीय शब्द, वाक्ये किंवा अशोभनीय अभिव्यक्ती या श्रेणीतील शब्दांमध्ये कमीना, काला सत्र, दलाल, खून की खेती, दोहरा चरित्र, निकम्मा, नौटंकी, ढिंढोरा पीटना, बहरी सरकार, चिलम लेना, छोकरा, कोयला चोर, गोरू चोर, चरस पीते हैं, सांड, तानाशाही, तानाशाह, अराजकतावादी, गद्दार, अपमान, गिरगिट, गूंस, घड़ियाली आंसू, असत्य, गद्दार, करप्ट, अहंकार, काला दिन, काला बाजारी, खरीद फरोख्त, दंगा, दलाल, दादागीरी, बेचारा, बहरी सरकार, संवेदनहीन, बॉबकट, विश्वासघात लॉलीपॉप, सेक्सअल हरेसमेंट शब्द देखील समाविष्ट केले आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -