घरताज्या घडामोडीराजीव सातवांवर बोलताना प्रियंका गांधींना वडिलांची आठवण, म्हणाल्या...

राजीव सातवांवर बोलताना प्रियंका गांधींना वडिलांची आठवण, म्हणाल्या…

Subscribe

राजीव सातवांना पाठवलेला मॅसेज अखेर त्यांनी पाहिलाच नाही - प्रियंका गांधी

मलाही विश्वास बसत नाही की मी राजीव सातव यांच्या श्रद्धांजली सभेला हजर आहे. राजीव सातव हे एक अशी व्यक्ती होते, ज्यांच्यावर आमचा संपुर्ण भरवसा होता. शांत स्वभाव, खऱ्या मनाची व्यक्ती जे नेहमीच जमीनीशी नाळ होते. आपल्या निष्टेसाठी त्यांनी इतक काम केले, त्या कामालाच पाहून सर्वांनी त्यांच्यातला गुण ओळखला. नेहमीच पक्षाला प्राथमिकता दिलेला असा सच्चा कार्यकर्ता. एक असा कार्यकर्ता आणि नेता जो आमच्यापासून खूपच लवकर आमच्यापासून हिरावला गेला. जेव्हा त्यांच्या कोरोनाच्या संसर्गाची माहिती मिळाली, तेव्हा त्यांना मी एक मॅसेज पाठवला होता. कधीच विचार आला नव्हता, की अस काही राजीव सातव यांच्यासोबत घडेल. खूपच तरूण असल्याने आणि हसतमुख चेहऱ्यामुळे कधीच अस वाटलच नाही हे सगळ घडेल. कोरोनाविरोधातल्या लढाईत राजीव सातव यांच्याशी दररोज राहुल गांधी आणि माझे बोलणे व्हायचे. राहुल डॉक्टरांसोबत दररोज याविषयी बोलत होता. सतत तब्येतीविषयी विचारपूस करण्यापासून आवश्यक ती मदत पुरवण्यापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते. काही वेळा व्हिडिओ कॉलवरही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न झाला. मी त्यांना पाठवेला मॅसेज शेवटचा ठरेल असे कधीच वाटले नव्हते.

राजीव गांधीही याच वयात आमच्यापासून हिरावले होते

जेव्हा तब्येत चांगली व्हायला लागली, तेव्हा वाटले की या लढाईतही त्यांचा विजय होईल. त्यांच्यात खूपच सहनशक्ती होती, त्यामुळेच या लढाईतूनही ते बाहेर पडतील असे वाटले होते. मी त्यांना एक मॅसेज पाठवला होता, जो त्यांनी पाहिला नाही. कारण राजीव सातव कोमात गेले होते. राजीव सातव यांना पाठवलेला तो मॅसेज माझ्यासाठी तो अखेरचा मॅसेज ठरला. जर तुम्ही हा मॅसेज वाचणार असाल तर मन तयार करा की तुम्ही या लढाईलाही जिंकणार आहात. पण दुर्दैव म्हणजे तो मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहचलाच नाही. त्यांना तो वाचताही आला नाही. मी त्यांच्या पत्नीशी बोलत होते तेव्हा विचार आला, की माझे वडिल राजीव गांधी हेदेखील ४६ व्या वर्षी आमच्यातून गेले. त्याच वयात राजीव सातवजीही आपल्यातून निघून गेले. समोर संपुर्ण उभ आयुष्य, देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणि क्षमताही त्यांच्यात होती. त्यांच्या जाण्याने आपल्याच कुटूंबातील व्यक्ती गमावल्याचे दुःख आहे. पक्षासाठी ही मोठी हानी आहे. त्यांच्या परिवारातील आई, पत्नी आणि दोन छोट्या मुलांसाठी आमच्या मनात खूपच खास जागा आहे. त्यांना या संकटातून धैर्याने लढवून बाहेर पडण्याची शक्ती मिळो अशीही भावना त्यांनी व्यक्ती केली.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -