घरदेश-विदेशCongress : प्रियंका गांधींमुळे हिमाचल प्रदेशमध्ये वाचले काँग्रेस सरकार; कसे ते वाचा...

Congress : प्रियंका गांधींमुळे हिमाचल प्रदेशमध्ये वाचले काँग्रेस सरकार; कसे ते वाचा…

Subscribe

हिमाचल प्रदेश : राज्यसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशमध्ये आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर असे वाटत होते की, काँग्रेस आणखी एक राज्य गमावेल. मात्र पक्षाच्या हायकमांडने सक्रियता दाखवल्यामुळे काँग्रेसचे संकट तर टळले आणि त्याठिकाणी सरकारही वाचले. विशेष म्हणजे हे संकट टाळण्यात आणि सरकार वाचविण्यात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय जनता पक्षाचे (BJP) ‘ऑपरेशन लोटस’ हाणून पाडण्यासाठी प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या सतत संपर्कात आहेत. (Priyanka Gandhi saved the Congress government in Himachal Pradesh)

हेही वाचा – Congress : नाना पटोलेंवर पदाधिकारी नाराज; 12 सदस्य पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला

- Advertisement -

हिमाचल प्रदेशातील सरकार पाडण्यासाठी भाजपाने ‘संपूर्ण षडयंत्र’ रचले असल्याचा दावा सूत्रांनी केला. परंतु बंडाची माहिती होताच त्याठिकाणी हायकमांड सक्रिय झाले. पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी लगेच सक्रिय झाल्या आणि त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह स्वत:चा पदभार स्वीकारला. ज्येष्ठ नेते भूपिंदरसिंग हुडा, डी. के. शिवकुमार आणि भूपेश बघेल यांना निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले. तसेच सर्वांना सोबत घेऊन जावे, अशा कडक सूचना देण्यात आल्या. प्रियंका गांधी यांच्यासोबत पक्षाध्यक्ष, मुख्यमंत्री, मंत्री आणि सर्व महत्त्वाचे नेते सतत संपर्क होते.

दरम्यान, 2022 मध्ये हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रियांका गांधी काँग्रेसच्या प्रचाराचा चेहरा होत्या. त्यांनी याआधीही काँग्रेससाठी “समस्यानिवारक” ची भूमिका बजावली आहे. काँग्रेसच्या सहा आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केल्यानंतर हिमाचल प्रदेशमधील एकमेव राज्यसभेची जागा भाजपाने जिंकली होती. वित्त विधेयकावर सरकारच्या बाजूने मतदान करून आमदारांनी सभागृहात पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केले होते. ज्यामुळे राज्यात राजकीय संकट निर्माण झाले होते. विधानसभेचे अध्यक्ष कुलदीपसिंग पठानिया यांनी आज या सहा आमदारांना अपात्र ठरवले.

- Advertisement -

हेही वाचा – Congress : नाना पटोलेंवर पदाधिकारी नाराज; 12 सदस्य पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला

काँग्रेसने केली होती प्लोर टेस्टची मागणी

दरम्यान, बुधवारी जयराम ठाकूर यांनी पक्षाच्या आमदारांसह राजभवनात राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी राज्य करण्याचा जनादेश गमावला असल्याचा दावा करत फ्लोर टेस्टची मागणी केली होती. त्यामुळे फ्लोर टेस्ट घेण्यात आली आणि काँग्रेसने आपले सरकार वाचवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -