घर ताज्या घडामोडी बेरोजगारी आणि 40% कमिशनमुळे कर्नाटकात हिंसाचार झाला, प्रियंका गांधींची केंद्र सरकारवर टीका

बेरोजगारी आणि 40% कमिशनमुळे कर्नाटकात हिंसाचार झाला, प्रियंका गांधींची केंद्र सरकारवर टीका

Subscribe

कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका पार पडण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, काँग्रेस आणि भाजपकडून जोरदार प्रचार करत आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी कर्नाटकात प्रचार सभेच्यादरम्यान मोदी सरकारवर टीका केली.

कर्नाटकातील मूडबिद्री येथील सभेला संबोधित करताना प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. कर्नाटकात हिंसाचार वाढत असेल तर तो फक्त बेरोजगारी आणि 40% कमिशन सरकारमुळे वाढत आहे. यापूर्वी 4 वेगवेगळ्या बँका होत्या. कॉर्पोरेशन बँक, विजया बँक, सिंडिकेट बँक आणि कॅनरा बँक आणि आता या सरकारमुळे या सर्व बँका एका बँकेत विलीन झाल्या आहेत, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

- Advertisement -

मी स्वप्न पाहिलं होतं, असं मोदी सकाळी म्हणत होते. मी कर्नाटकला देशातील सर्वात विकसित राज्य बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. तुम्ही स्वप्न पाहिले, तूम्ही सर्वज्ञानी, अंतर्यामी आहात. तुमचे स्वप्न भंग करण्याची हिंमत कोणात होती? मी सांगते तुम्हाला, तुमच्याच भाजप सरकारने तुमचे स्वप्न भंग केले आणि कर्नाटकला लुटले, असं म्हणत प्रियंका गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला.

- Advertisement -


हेही वाचा : जायचे होते जॅक्सनव्हिलला, पण पोहोचवले जमैकाला… अमेरिकन एअरलाइन्सची चूक पडली महागात


 

- Advertisment -