घरदेश-विदेशचार शिलेदार तंबूत परतले; पण भारतच जिंकणार प्रियंकांना विश्वास, सांगितला इंदिरा गांधींचा...

चार शिलेदार तंबूत परतले; पण भारतच जिंकणार प्रियंकांना विश्वास, सांगितला इंदिरा गांधींचा ‘तो’ किस्सा

Subscribe

आज तेलंगणामध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांची प्रचार सभा पार पडली. या प्रचारसभेत त्यांनी 1983 ला ज्यावेळी कपिल देव यांच्या नेतृत्त्वात विष्वचषक जिंकला त्यावेळी घडलेल्या एका किस्स्याबद्दल सांगितले.

तेलंगणा : 140 करोड भारतीय आज (ता. 19 नोव्हेंबर) भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यामधील थरार अनुभवत आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखो भारतीयांच्या उपस्थितीत हा सामना खेळला जात आहे. आजच्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पर्यंत भारताचे चार प्रमुख फलंदाज हे तंबूत परतले आहेत. त्यामुळे सध्या तरी हा सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजून झुकलेला असल्याचेच पाहायला मिळत आहे. एकीकडे वर्ल्डकपचा थरार सुरू असताना तेलंगणामध्ये मात्र निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. 30 नोव्हेंबरला तेलंगणात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. (Priyanka Gandhi told the story of 1983 at a campaign rally in Telangana)

हेही वाचा – ODI WordCup Final 2011 : माजी कर्णधार धोनीला दिलेल्या ट्रॉफीचा वाद पुन्हा चर्चेत; वाचा नेमकं प्रकरण काय?

- Advertisement -

पाच राज्यातील निवडणुकींपैकी 3 राज्यांच्या निवडणुका या पार पडल्या आहेत. आता केवळ राजस्थान आणि आणि तेलंगणा येथे निवडणुका होणे बाकी आहे. आज तेलंगणामध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांची प्रचार सभा पार पडली. या प्रचारसभेत त्यांनी 1983 ला ज्यावेळी कपिल देव यांच्या नेतृत्त्वात विष्वचषक जिंकला त्यावेळी घडलेल्या एका किस्स्याबद्दल सांगितले. या प्रचार सभेत बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, “मला आठवते, 1983 मध्ये ज्यावेळी भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी इंदिराजी खूप आनंदी होत्या, त्यांनी संपूर्ण भारतीय संघाला चहासाठी घरी बोलावले होते. आज इंदिराजींचा वाढदिवस आहे आणि आपण पुन्हा विश्वचषक नक्कीच जिंकू.” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

भारतीय संघाने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. परंतु, ही कामगिरी तेव्हाच महत्त्वाची ठरेल जेव्हा तिसऱ्यांदा भारताचे विश्वचषकावर नाव कोरले जाईल. पण कांगारूंचा संघही यावेळी फॉर्मात आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही पुन्हा विश्वचषक त्यांच्या मायदेशी घेऊन जाण्यासाठी जोरदार लढत देण्यात येत आहे. मात्र, यंदा विश्वचषक भारताचा संघच विजयी करणार असा विश्वास भारतीयांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -