घरताज्या घडामोडीUP Congress Manifesto 2022: यूपी निवडणुकीसाठी प्रियंका गांधींकडून जाहीरनामा प्रसिद्ध; 10 दिवसांत...

UP Congress Manifesto 2022: यूपी निवडणुकीसाठी प्रियंका गांधींकडून जाहीरनामा प्रसिद्ध; 10 दिवसांत शेतकऱ्यांचे कर्जमाफ, वीजबिल हाफ

Subscribe

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ मधील पहिल्या टप्प्यातील मतदान उद्यापासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेसने आज आपला जाहीरनामा घोषित केला आहे. काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी वाड्रा यांनी काँग्रेस प्रदेश मुख्यालयात ‘उन्नति विधान’ नावाचा जाहीरनामा घोषित केला आहे. काँग्रेसने या जाहीरनाम्यात शेतकरी आणि बेरोजगारांसाठी काही आश्वासने केली आहेत. यापूर्वी काँग्रेसने तरुणांसाठी ‘भर्ती विधान घोषणा पत्र’ आणि महिलांसाठी ‘शक्ति विधान घोषणा पत्र’ घोषित केले होते. तसेच काँग्रेसच्यापूर्वी मंगळवारी भाजप आणि समाजवादी पार्टीने आपला जाहीरनामा जाहीर केला होता.

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी जाहीरनामा घोषित करत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या की, ‘आम्ही सर्वसामान्यांच्या समस्या यामध्ये सामील केल्या आहेत. इतर पक्षाप्रमाणे दुसऱ्या पक्षांच्या घोषणा सामील केल्या नाहीत. आज सर्वात मोठी समस्या बेरोजगारी आणि महागाई आहे. याबाबत अनेक घोषणा केल्या आहेत. जर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येते तर १० दिवसांत शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाईल.’

- Advertisement -

तसेच प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘शेतकऱ्यांकडून पंचवीशे रुपयांत गहू आणि तांदूळ, तर चारशे रुपयांमध्ये उस खरेदी केले जाईल. तसेच सर्वांचे वीज बील हाफ केले जाईल. कोरोना काळात ज्यांच्या वीज बिलांची थकबाकी असेल त्यांचे भरले जाईल. तसेच कोरोनाचा सर्वात जास्त परिणाम ज्या कुटुंबावर झाला, त्यांना २५ हजार रुपयांची मदत केली जाईल. २० लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. या नोकऱ्यांमध्ये महिलांना ४० टक्के आरक्षण दिले जाईल. जर कोणी आजारी असेल तर त्याच्यावर सरकारकडून १० लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत केला जाईल.’

भटक्या जनावरांच्या समस्यांबाबत घोषणा करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘नुकसानग्रस्तांना प्रति एकर तीन हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी गोधन न्याय योजना सुरू केली जाईल. यामध्ये शेतकऱ्यांकडून दोन हजार किलो शेण खरेदी केली जाईल. असे छत्तीसगढ राज्यात होत आहे. तसेच छोट्या व्यावसायिकांना चालना देण्यासाठी क्लस्टर विकसित केले जाईल. आउटसोर्सिंग बंद होईल. सर्व कंत्राटी कामगारांना टप्प्याटप्प्याने नियमित केले जाईल. शिक्षकांना नियमित केले जाईल.’

- Advertisement -

यादरम्यान काँग्रेस जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सलमान खुर्शीद म्हणाले की, ‘आम्ही आतापर्यंत दोन जाहीरनामा घोषित केला आहे. ज्यामध्ये पहिला महिलांसाठी आणि दुसरा तरुणांसाठी होता. आता आमचा तिसरा आणि शेवटचा जाहीरनामा घोषित करत आहोत. यासाठी आम्ही जवळपास एक लाख लोकांसोबत बातचित केली आहे. तसेच आम्ही समाजातील प्रत्येक वर्गासोबत बातचित करून जाहीरनामा तयार केला आहे.’

काँग्रेसने कोणती आश्वासने केली? 

१०वी आणि १२वी पास मुलींना स्मार्टफोन आणि स्कूटी दिली जाईल.
गाव तलावांसह जलाशयांचे मॅपिंग आणि नोंदणी केली जाईल.
सूक्ष्म आणि लघु उद्योगासाठी क्रेडिट गारंटी फंड ट्रस्ट अंतर्गत गारंट मोफत कर्ज दिले जाईल.
आउटसोर्सिंग बंद केले जाईल आणि कंत्राटी रोजगाराला युक्ती संगत केले जाईल.
शाळांमध्ये माध्यान्ह भोजन शिजवणाऱ्या स्वयंपाक्याला ५ हजार मानधन दिले जाईल.
मृत्यू झालेल्या कोविड योद्धांच्या ५० लाखांची भरपाई दिली जाईल
झोपडपट्टीवासियांना जमिनीचा हक्क मिळेल
गावप्रमुखाच्या पगारात वाढ होईल
चौकीदाराचा पगार ५० हजार केला जाईल
उर्दू शिक्षका आणि सर्वाधिक मागास जातींसाठी उप-कोटा केला जाईल.
SC, STच्या विद्यार्थ्यांना KG ते PG पर्यंत मोफत शिक्षण दिले जाईल.
दिव्यांगांना 3 हजार पेन्शन मिळेल.
गृहजिल्ह्यात महिला पोलिसांची नियुक्ती केली जाईल.
माजी सैनिकांसाठी विधान परिषदेची जागा मिळेल
भगवान परशुराम जयंतीनिमित्त सुट्टी दिली जाईल.
नद्यांच्या संसाधनांवर निषादांचा अधिकार असेल


हेही वाचा – BJP SP manifesto UP election : शेतकऱ्यांना मोफत वीज, वर्षाला २ सिलेंडर मोफत, भाजप अन् सपाकडून ९ सारखीच आश्वासनं


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -