Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी लवकरच यूपीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रियांका गांधींचे नाव घोषित करू - ज्येष्ठ...

लवकरच यूपीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रियांका गांधींचे नाव घोषित करू – ज्येष्ठ काँग्रेस नेते

Related Story

- Advertisement -

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक २०२२ साठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजप तळागाळात मजबूत संघटनेच्या बळावर काम करत आहे. तसेच सपाही लढाई लढण्याची तयारी करत आहे. शिवाय बसपा २०१७च्या फॉर्म्युल्यावर अवलंबून राहून चित्र बदलण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु यामध्ये काँग्रेस निवडणुकीच्या लढाईमधून बाहेर असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस प्रियांका गांधींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली जाईल. लवकरच प्रियांका गांधी यांना आम्ही उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करू. सलमान खुर्शीद यांच्या या विधानामुळे उत्तर प्रदेच्या राजकारणात हालचालीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

नक्की काय म्हणाले सलमान खुर्शीद?

‘उत्तर प्रदेशमधील २०२२ची विधानसभा निवडणूक आम्ही प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये विजय मिळवण्यासाठी प्रियांका गांधी कठोर परिश्रम घेत आहेत. लवकरच आम्ही त्यांना उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करू,’ असे सलमान खुर्शीद म्हणाले.

- Advertisement -

यापूर्वी उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसने एक प्रोमो प्रसिद्ध केला होता. यामध्ये प्रियांका गांधी यांचा उल्लेख ‘उत्तर प्रदेशची आशा’ असा केला गेला आहे. दरम्यान २०२२च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने एक प्रतिज्ञा यात्रा काढण्याची घोषणा केली असून निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्वसामान्यांसोबत संपर्क अधिक वाढवण्यासाठी घरोघरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. आता काँग्रेसने या निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे.


हेही वाचा – झेडपीच्या निवडणुका ओबीसी V/S ओपन अशा होणार नाहीत, अन्यथा महागात पडेल, वडेट्टीवारांचं मोठं विधान


- Advertisement -

 

- Advertisement -