UP Elections 2022 : बलात्कार, हिंसाचाराने पिडित महिलांना निवडणुकीचे तिकिट, युपीत काँग्रेसचा मास्टर प्लान

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने मास्टर प्लान तयार केला आहे. यूपीमधील बलात्कार आणि हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिलांना काँग्रेसकडून तिकीट दिलं जाणार आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी ‘लडकी हूं लड़ सकती हूं’ या घोषणेद्वारे तिकीट वाटपात सर्वाधिक प्राधान्य लढवय्या महिलांना म्हणजेच बलात्कार, हिंसाचाराने पीडित महिलांना दिलं जाणार आहे. यासाठी काँग्रेसने तिकीट वाटप करण्यासाठी मास्टर प्लान तयार केला आहे.

यूपीमध्ये अपमान,हिंसाचार, बलात्कार आणि पीडित महिलांची यादी तयार करण्यात येत असल्याचं सांगितलं जातंय. महिलांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना तिकीट देण्याचा विचार केला जात आहे. यामध्ये उन्नाव आणि हाथरस बलात्कार यांसारख्या पीडितांच्या नातेवाईकांचा समावेश आहे.

लढवय्या महिलांना प्रियांका गांधी देणार संधी

प्रियांका गांधींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार त्यांनी सांगितलं की, लढवय्या महिलांना पक्षाकडून तिकीट दिली जाणार आहे. आमच्या यादीत अशा महिलांची नावं आहेत. ज्या स्वत:च्या पायावर उभे राहू इच्छितात आणि ज्या संघर्ष करू इच्छितात. जर तुमच्यावर कोणत्याही आमदाराने अत्याचार केला असेल, तर आम्ही तुम्हाला तिकीट देऊ. तुम्ही निवडणूक लढा आणि आमदार व्हा, असं प्रियांका गांधींनी म्हटलं आहे.

दरम्यान, पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना निवडणूक लढवण्यास सांगू. महिला निवडणूक लढण्यास तयार झाल्यानंतर त्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. प्रामुख्याने यूपीमध्ये उन्नाव, हाथरस, शाहजहानपूर आशा वर्कर, लखीमपूर खिरीमधून अशा चार प्रमुख शहरांतून पीडित महिलांना तिकीट दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.


हेही वाचा : Virat Kohli Century: विराट कोहलीचा शतकांचा असाही विक्रम, रहाणेही एक पाऊल मागे