घरदेश-विदेशन्यूझीलंडमध्ये प्रियंका राधाकृष्णननचा बोलबाला; अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला

न्यूझीलंडमध्ये प्रियंका राधाकृष्णननचा बोलबाला; अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला

Subscribe

न्यूझीलंडचे पंतप्रधान जैसिंडा आर्डर्न (Jacinda Ardern) यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात पाच नवीन मंत्र्यांचा समावेश केला असून, त्यापैकी प्रियंकाचेही नाव आहे.

भारतीय असणारी प्रियंका राधाकृष्णन यांनी सोमवारी न्यूझीलंडमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली आणि न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात प्रवेश घेणारी ही पहिली भारतीय ठरली. प्रियंका ही मूळची केरळची असून ती न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये राहते. न्यूझीलंडचे पंतप्रधान जैसिंडा आर्डर्न (Jacinda Ardern) यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात पाच नवीन मंत्र्यांचा समावेश केला असून, त्यापैकी प्रियंकाचेही नाव आहे. दोन आठवड्यांपूर्वी आर्डर्न यांच्या पक्षाने देशातील सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळविला. नवीन मंत्र्यांची घोषणा करताना पंतप्रधान जैसिंडा आर्डर्न म्हणाले की, “काही नवीन कलागुणांसह लहान-मोठे सर्वच अनुभव असणार्‍या लोकांना सामील करून घेण्यास मी उत्सुक आहे.”

भारतात जन्मलेल्या तसेच लेबर पार्टीच्या वयवर्ष ४२ असणाऱ्या नेत्या प्रियंका म्हणाल्या, ‘आजचा दिवस खूपच विशेष आहे. आमच्या सरकारचा एक भाग असल्याच्या विशेष भावनेने मी भारावून गेले आहे. त्यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये लिहिले की, ‘ज्यांनी मला अभिनंदन केले त्या प्रत्येकाचे मनापासून मी आभार मानते. मंत्री म्हणून नियुक्त झाल्याने माझ्याकडे शब्द नाहीत आणि या कार्यकाळात मंत्र्यांच्या उत्कृष्ट गटासह काम करण्यास उत्सुक आहे.’

- Advertisement -

प्रियंकाचा जन्म चेन्नईमध्ये झाला, परंतु केरळमधील पॅराव्होर येथील तिचे कुटुंब आहे. तिने सिंगापूरमध्ये शालेय शिक्षण घेतले आणि त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती न्यूझीलंडला आले. ती तिच्या पतीसमवेत ऑकलंडमध्ये राहते. घरगुती हिंसाचारात बळी पडलेल्या आणि शोषणात बळी पडलेल्या महिलांसाठी तिने सतत आवाज उठविला आहे.

दरम्यान, न्यूझीलंडच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लेबर पार्टीने मोठा विजय मिळविला. न्यूझीलंडचे पंतप्रधान जैसिंडा आर्डर्न यांच्या नेतृत्वात लेबर पार्टीला ४९ टक्क्यांहून अधिक मते मिळाली, तर नॅशनल पार्टीला २६.९ टक्के मते मिळाली. १२० सभासद असलेल्या संसदेमध्ये लेबर पार्टीला १२० हून अधिक खासदार मिळू शकतात, जे बहुमतापेक्षा जास्त आहेत.


ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नात दहशतवादी हल्ला; तीन ठार, अनेकजण जखमी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -